Homeकोपरगावमराठी भाषेची गोडी ग्रामीण बोली भाषेत असून प्रमाण भाषा व बोली भाषा...

मराठी भाषेची गोडी ग्रामीण बोली भाषेत असून प्रमाण भाषा व बोली भाषा जतन करणे आवश्यक आहे – माजी नगराध्यक्ष पदमकांतजी कुदळे

या वेळी माजी नगराध्यक्ष विजयराव वहाडणे यांनी आपल्या शैलीत अनेकविध प्रकारच्या वात्रटिका सादर करून एक अनोखी शाब्दिक मेजवानी दिली कालच त्यांचा वाढदिवस साजरा झाला आणि आज कवि कुसुमाग्रज जन्मदिवस हा योगायोग असल्याचे पदमकांतजी कुदळे यांनी सांगितले

संपादक – राजेंद्र तासकर
मराठी भाषा दिनानिमित्त अनेक ठिकाणी अनेक प्रकारे विचारमंथन व प्रबोधन केले जाते मराठी भाषा जतन संवर्धन करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत परंतु कालौघात बदल घडतात आणि आपली मराठी भाषा आपल्या पासून दुरावत जाते आहे इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी भाषा कमकुवत होते आहे घरातही मराठी भाषा कमी प्रमाणात वापरात असून खरे मराठीपण ग्रामीण बोलीभाषेत असून ती जतन केली जावी असे विचार माजी नगराध्यक्ष पदमकांतजी कुदळे यांनी व्यक्त केले.
कवी कुसुमाग्रज जयंती मराठी भाषा दिन म्हणून साजरी केली जाते या प्रसंगी शब्द गंध साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्य कोपरगाव शाखेच्या वतीने कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते.
या वेळी कवी कुसुमाग्रजांच्या प्रतीमेचे पूजन करण्यात आले त्यावेळी माजी नगराध्यक्षा सौ ऐश्वर्या लक्ष्मी सातभाई,राजेंद्र कोयटे,संतोष तांदळे,अॅड सौ. पुनम गुजराथी,सौ शैलजा रोहोम, कैलास साळगट आदि मान्यवर उपस्थित होते.
स्वागत प्रास्ताविक कैलास साळगट यांनी केले मराठी भाषेविषयी कवी संतोष तांदळे, वात्रटिकाकार राजेंद्र कोयटे,डॉ. दादासाहेब गलांडे,सौ कुलकर्णी मॅडम,श्वेतांबरी राऊत यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कविसंमेलन प्रसंगी नंदकिशोर लांडगे,सोमनाथ मंडाळकर, दत्तात्रय विरकर,प्रमोद येवले हेमचंद्र भवर,सौ.सुनीताताई इंगळे,प्रा मधुमिता निळेकर, बालकवयित्री पावले आदिंनी आपल्या कविता सादरीकरण केले.
समारंभासाठी अजीत कसाब ग्रंथपाल कोळगे राऊत कवी बाळासाहेब देवकर आदि मान्यवर उपस्थित होते. सुत्रसंचलन प्रा मधुमिता निळेकर यांनी केले व शेवटी आभार राजेंद्र कोयटे यांनी मानले.

    
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!