Homeकोपरगावश्रीपतराव गवळी सोसायटीच्या संचालकपदी गवळी व आभाळे यांची बिनविरोध निवड

श्रीपतराव गवळी सोसायटीच्या संचालकपदी गवळी व आभाळे यांची बिनविरोध निवड

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

कोपरगाव : – तालुक्यातील मढी खुर्द येथील श्रीपतराव तात्याबा गवळी सहकारी सोसायटीच्या दोन रिक्त जागेवर बबन श्रीपतराव गवळी व गोपिनाथ रूंजा आभाळे यांची गुरूवारी बिनविरोध निवड झाली. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून कोपरगांव सहायक निबंधक कार्यालयाचे ए.ई.शेख यांनी काम पाहिले.

या नवनिर्वाचित संचालकांचा सोसायटीच्या वतीने सत्कार करण्यांत आला. सत्कारास उत्तर देतांना बबन श्रीपतराव गवळी व गोपिनाथ आभाळे म्हणाले की,संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली सभासद विकासाच्या योजनांची अंमलबजावणी करत सभासद शेतकऱ्यांचा विकास करू.ही निवड बिनविरोध करण्यांत सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक व संस्थेचे अध्यक्ष रमेश आभाळे,उपाध्यक्षा सौ.सिंधुताई साहेबराव गवळी, शिवाजीराव गवळी,रामभाउ आभाळे,दत्तात्रय गवळी,राजेंद्र गवळी, बापूसाहेब गवळी यांच्यासह सर्व संचालकांनी विशेष सहकार्य केले.माजी आमदार स्नेहलता कोल्हे व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांनी नवनिर्वाचित संचालकांचे विशेष अभिनंदन केले आहे.सहायक निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून संस्थेचे सचिव संदिप चौधरी यांनी काम पाहिले व आभार मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!