
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव : -पुणे,२१,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि युथ फॉर जॉब्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पदवीधर दिव्यांग विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्यात येणार आहे.’कॉलेज कनेक्ट’ प्रोग्राम अंतर्गत देण्यात येणारे हे प्रशिक्षण मोफत असून याद्वारे दिंव्यांग विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
दिव्यांग विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी मिळावी म्हणून घेण्यात येणाऱ्या या प्रशिक्षण कार्यक्रमात सर्व्हिस डेस्क,फुल स्टॅक,जावा डेव्हलपमेंट आणि डिजिटल एक्सेसिबिलिटी या विषयाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.हे प्रशिक्षण २ महिने चालणार असून हे निवासी स्वरूपाचे असणार आहे.राज्यभरातील १८ ते ३५ वयोगटातील पदवीधर दिव्यांग विद्यार्थ्यी यात सहभागी होऊ शकतील.या प्रशिक्षणानंतर कंपन्यांमध्ये रोजगार मिळवून देण्यासाठीही मोफत सहाय्य करण्यात येईल.
मागील वर्षी याच उपक्रमातून पुणे विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयच्या सर्व प्रकारच्या २०० हून अधिक दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले गेले. त्यांपैकी ५१ विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांमध्ये रोजगार देऊन स्वतःच्या पायावर उभा करण्याच्या प्रयत्न केला गेला आहे.या प्रशिक्षणासाठी उत्सुक विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सर्व समावेशक शिक्षण व सुगम्यता केंद्र,खेर वाडमय भवन येथे तसेच बालाजी शिंदे-916899 3089,प्राजक्ता-9347411906 यांच्याशी संपर्क करायचा आहे.