
संपादक -राजेंद्र तासकर
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शहा गावच्या महिला सरपंच सौ.शुभांगी जाधव यांनी एस डी जाधव इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये जाऊन महिला शिक्षिकांसमवेत केक कापून व त्यांना गुलाबपुष्प देऊन त्यांचा सन्मान करून साजरा केला.
यावेळी शहा गावच्या सरपंच सौ शुभांगी जाधव,एस डी जाधव शाळेच्या सर्व महिला शिक्षिका व शहा गावातील काही महिला उपस्थित होत्या.
यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सौ.शुभांगी जाधव म्हणाल्या कि,स्त्री शिक्षण महत्वाचे असून महिला या आत्मसन्मानाचे केंद्र आहे त्या प्रत्येक क्षेत्रात भरारी घेऊन आकाशाला गवसणी घालण्याचे काम करतआहे,उन्नत समाज घडविण्यासाठी सावित्रीबाई फुले यांनी महिला शिक्षणाला महत्त्व दिले असेही त्या म्हणाल्या. शाळेच्या महिला शिक्षिकांनीही सरपंच यांचा सत्कार करून त्यांचे आभार मानले व स्त्रीयां प्रती स्त्रीयांमध्ये असणाऱ्या आत्मसन्मानाचे दर्शन घडविले. शाळेतील काही विद्यार्थ्यांनी महिला हि फक्त एक स्त्री नसून तिच्या मध्ये अनेक नातेसंबंध दडलेले आहे म्हणुनच आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये स्रीला अनन्य साधारण महत्व प्रदान करण्यात आले आहे,असे आपल्या मनोगत व्यक्त करतांना सांगितले.