Homeकोपरगाव॥श्री राम चरित्र चिंतन कथेचा॥,राम भक्तांनी लाभ घ्यावा….

॥श्री राम चरित्र चिंतन कथेचा॥,राम भक्तांनी लाभ घ्यावा….

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

कोपरगाव : -कोपरगाव शहरातील मध्यवर्ती तहसील कार्यालय शेजारील मैदानात शुक्रवार,दिनांक १२ जानेवारी २०२४ ते गुरुवार १८ जानेवारी २०२४ या कालावधीत दररोज ७ दिवस सायंकाळी ००: ०७ ते १०:०० वाजेपर्यंत त्रंबकेश्वर येथील शिवभक्त भाऊ पाटील यांच्या प्रवचनाने होणार आहे.

कथेचे आयोजन: जय जनार्दन भक्त व चांगदेवराव कातकडे,मिलनकुमार चव्हाण,मंगेश पाटील,दीपक कोटमे,पराग संधान,मनोज अग्रवाल,राजेश ठोळे,विजय कडू,प्रशांत होन,संदीप कोयटे,हिरालाल महानुभाव,दिनार कुदळे यांनी केले आहे.

या कार्यक्रमाला ब्र.प.पू स्वामी मधुगिरीजी महाराज,प.पू.स्वामी मठाधिपती रमेशगिरीजी महाराज व प.पू.स्वामी माधवगिरीजी महाराज यांचे आशीर्वाद लाभले आहेत.

श्री राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी (मौनगिरीजी) महाराज यांच्या कृपाशीर्वादाने व अयोध्यातील प्रभु श्री. रामचंद्राच्या जन्मभूमीत संपन्न होणाऱ्या,श्री राम मंदिर स्थापना समारंभाचे औचित्य साधून श्री राम भक्त व समस्त भाविकांकरिता मर्यादा पुरुषोत्तम श्री राम याच्या दिव्य जीवनावर आधारित श्री राम चरित्र चिंतन कथेचे आयोजन करण्यात येत आहे.तरी सर्वांनी कथा श्रावणाचा लाभ घ्यावा ही विनंती.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!