Homeकोपरगावसौ.स्नेहलताताई कोल्हे यांची श्रीराम मंदिरात मनोभावे रामभक्त म्हणून स्वच्छता सेवा

सौ.स्नेहलताताई कोल्हे यांची श्रीराम मंदिरात मनोभावे रामभक्त म्हणून स्वच्छता सेवा

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

कोपरगाव : अयोध्या येथे येत्या २२ जानेवारी रोजी होणाऱ्या श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशवासियांना आपल्या गावातील तीर्थक्षेत्र आणि मंदिरांमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्याचे आवाहन केले आहे.त्यानुसार माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी शुक्रवारी (१९ जानेवारी) श्रमदानातून कोपरगाव शहरातील श्रीराम मंदिरात सेवा व परिसरात साफसफाई केली.यावेळी त्यांनी स्वत:हातात झाडू,मॉप घेऊन श्रीराम मंदिराचा सभामंडप,परिसर स्वच्छ केला व सर्वच मंदिरे आपण सर्वांनी मिळून स्वच्छ करून राम मंदिरोत्सव आनंदाने साजरा करू अशी विनंती केली.तसेच श्री महादेव मंदिरातही त्यांनी साफसफाई केली. याप्रसंगी श्रीराम मंदिर ट्रस्टचे सर्व पदाधिकारी,महिला भगिनी, श्रीरामभक्त,कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अयोध्येत होणाऱ्या श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने सर्वांनी २२ जानेवारीला संध्याकाळी घरोघरी श्रीराम ज्योत प्रज्वलित करावी.श्रीराम दीप,कंदील लावून अभूतपूर्व अशी दिवाळी साजरी करावी. विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करून या आनंदोत्सवात सहभागी व्हावे,असे आवाहन स्नेहलताताई कोल्हे यांनी जनतेला केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!