
विद्यार्थ्याना शालेय साहित्य व वहयांचे वाटप करतांना अँड.दिपक पोळ
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव : -परिस्थिती अनुकूल असो की प्रतिकूल मात्र त्यातून शिक्षण घेतले तर या शिक्षणामुळे हक्क आणि कर्तव्य यांची जाणीव होते असे प्रतिपादन कोपरगाव न्यायालया तील ॲड.दिपक पोळ यांनी व्यक्त केले. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने नाटेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झालेल्या ध्वजा वंदन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या वेळी ॲड.दिपक पोळ यांनी त्यांचे वडील नाटेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते कै.दादाहरी बाबुराव पोळ यांच्या स्मरणार्थ शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व वह्यांचे वाटप ॲड.दिपक पोळ यांच्या वतीने करण्यात आले.
या वेळी बोलताना पोळ पुढे म्हणाले की,संत गाडगे बाबा हे आपल्या कीर्तनातून जनजागृती करत असताना सांगायचे की,तुमच्याकडे मिळणाऱ्या तुटपुंज्या पगारात स्वतःच्या प्रपंचा बरोबर आपल्या मुलांच्या शिक्षणावर खर्च करावे तसेच अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला समता,स्वातंत्र्य,बंधुता आणि सामाजिक न्याय असलेली राज्य घटना दिली.मुलांना शिक्षण मिळाल्यास त्यांना त्यांच्या हक्क आणि कर्तव्ये यांची जाणीव होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केले
या वेळी मुख्यध्यापक श्री.पाटील सर श्री.मंचरे सर,श्रीमती राऊत मॅडम, थोरत मॅडम,निळे मॅडम शाळा व्यवस्थापन समितीचे गणेश मोरे,सरपंच शिवनाथ मोरे,डॉ.गोरख मोरे,कौतिक मोरे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.