Homeकोपरगावएस.एस.जी.एम.कॉलेजच्या बी.बी.ए.विभागाचा पालक मेळावा उत्साहात संपन्न

एस.एस.जी.एम.कॉलेजच्या बी.बी.ए.विभागाचा पालक मेळावा उत्साहात संपन्न

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

कोपरगाव : येथील रयत शिक्षण संस्थेच्या एस.एस.जी.एम. कॉलेजमध्ये बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन’(B.B.A.) विभागाद्वारे ‘पालक-शिक्षक मेळावा’आयोजित करण्यात आला.विद्यार्थ्यांच्या कामगिरीत सुधारणा करण्यासाठी शिक्षकांशी पालकांचा संवाद,त्यांच्या अपेक्षांविषयी चर्चा आणि बी.बी.ए विभागातील विविध उपक्रमांची माहिती देणे ही या मेळाव्या मागील भूमिका होती.सदर मेळाव्याचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.आर.सानप यांनी भूषवले.

पालकांनी स्वेच्छेने कॉलेजबद्दल तसेच शिक्षकांबद्दल,विद्यार्थ्यांची प्रगती, त्यांची शैक्षणिक वाढ,उपस्थिती याबद्दल त्यांचे मत व्यक्त करून काही प्रेरणादायी उदाहरणे दिली.त्यानंतर काही विद्यार्थ्यांनी पालकांसाठी आपले विचार,भावना,अपेक्षा व्यक्त केल्या.पालक प्रतिनिधी म्हणून लाभलेले श्री. ज्ञानेश्वर पांगारकर यांनी त्यांच्या पाल्यामध्ये झालेला सकारात्मक बदल नुकत्याच झालेल्या ऑक्टोबर २०२३ या परीक्षेमध्ये पाल्याला मिळालेले नैपुण्य याविषयी भाष्य केले व नॅक ची A++ ग्रेड मिळाल्याबद्दल प्राचार्यांचे व प्राध्यापकांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.तसेच पालकांनी स्वेच्छेने कॉलेजबद्दल तसेच शिक्षकांबद्दल,विद्यार्थ्यांची प्रगती,त्यांची शैक्षणिक वाढ, उपस्थिती याबद्दल त्यांचे मत व्यक्त करून काही प्रेरणादायी उदाहरणे दिली.त्यानंतर काही विद्यार्थ्यांनी पालकांसाठी आपले विचार,भावना, अपेक्षा व्यक्त केल्या.
तसेच याप्रसंगी श्री.सोपान गाडेकर,श्री.अशोक कानडे,श्री.गंगाधर बर्डे,सौ. भारती चिने,सौ.शीतल गायकवाड.श्री.राधाकृष्ण दुबे,सौ.पद्मिनी परमार, सौ.सुरेखा पांगारकर इ.पालकांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय प्राचार्य डॉ.आर.आर.सानप यांनी अध्यक्षीय भाषणात “नुकत्याच कॉलेज ला मिळालेल्या  NAAC  च्या  A++ च्या  मानांकना बद्दल सर्व पालक,विद्यार्थी, शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.तसेच त्यांनी पालक मेळाव्याचे महत्व स्पष्ट केले.त्याचबरोबर कॉलेज मधील शिस्त व कामातील प्रामाणिकपणा याबद्दल बोलत असतांनी त्यांनी आपले अनुभव सांगून पालकांना व विद्यार्थ्यांना संबोधित केले”.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून विभाग प्रमुख प्रा.नितीन साळवे यांनी पालक मेळावा घेण्यामागील भूमिका स्पष्ट केली.सदर कार्यक्रमासाठी प्रा. गांधी सी.एम.प्रा.गवारे एम.बी.,प्रा.जाधव एस.एस यांची उपस्थिती लाभली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.गवारे एम.बी.यांनी केले.उपस्थितांचे आभार प्रा.जाधव एस.एस.यांनी व्यक्त केले.

सदर कार्यक्रमप्रसंगी महाविद्यालयातील बी.बी.ए विभागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!