
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव : सन 2023/24 या शैक्षणीक वर्षामध्ये घेण्यात आलेल्या शासकीय इलिमेंटरी परिक्षेमध्ये संजीवनी इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यानी घवघवीत यश संपादन करून 100% निकालाची परंपरा कायम ठेवली असल्याची माहिती शाळेचे प्राचार्य मोहसीन शेख सर यांनी दिली.
या शैक्षणिक वर्षात इलिमेंटरी चित्रकला परिक्षेसाठी या शाळेतून एकूण 26 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता,सहभागी सर्वच्या सर्व 26 विद्यार्थी या परिक्षेमध्ये उत्तीर्ण झाले आहे.या सर्व विद्यार्थ्यानी अभिमानस्पद यश संपादन करून शाळेची गुणवत्ता सिद्ध केली असल्याचे गौरवोद्गार शाळेच्या मॅनेजिंग ट्रस्टी सौ.रेणुकाताई विवेक भैय्या कोल्हे यांनी काढले.
या सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्याचे व त्यांना अनमोल मार्गदर्शन करणारे शाळेतील कला शिक्षक श्री सचिन पाटसकर सर व श्रीमती शेख मॅडम यांचे शाळेच्या मॅनेजिंग ट्रस्टी सौ.रेणुकाताई विवेकभैय्या कोल्हे व शाळेचे प्राचार्य मोहसीन शेख सर तसेच सर्व शिक्षक वृंद,शिक्षकेतर कर्मचारी,सर्व पालक वर्ग यांनी अभिनंदन करून मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.