Homeकोपरगावनेट परीक्षा उत्तीर्ण मोरेश बांगर यांचा सत्कार संपन्न

नेट परीक्षा उत्तीर्ण मोरेश बांगर यांचा सत्कार संपन्न

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

कोपरगाव- येथील एस.एस.जी.एम.महाविद्यालयाचे कार्यालयीन सेवक श्री.मोरेश बांगर हे नुकतेच नेट परीक्षा उत्तीर्ण झाले.

सीनियर महाविद्यालयाच्या व्याख्याता पदासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाद्वारे घेतली जाणारी ही पात्रता परीक्षाआहे.कोपरगाव जवळील येवला येथील रहिवासी असलेले श्री.मोरेश बांगर हे गेल्या बारा वर्षापासून रयत शिक्षण संस्थेत कार्यालयीन सेवक म्हणून कार्यरत असून मागील ४ वर्षापासून एस.एस.जी.एम.महाविद्यालयात आहेत.श्री बांगर यांनी आपले कार्यालयीन कामकाज सांभाळून अर्थशास्त्रातील एम.ए.ही पदव्युत्तर पदवी मिळविली.त्यानंतर व्याख्याता पदासाठीची ही पात्रता परीक्षा उत्तीर्ण केली आहे.श्री बांगर हे संगणकीय कामकाजात देखील पारंगत आहेत.

कार्यालयीन सेवकाने अल्पवयात व्याख्याता पदासाठीची पात्रता परीक्षा उत्तीर्ण करणे,ही महाविद्यालयाच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे.त्यामुळे या यशाबद्दल श्री.बांगर यांचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणे मा.अशोक सोनवणे व रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन, कॉलेज विकास समितीचे चेअरमन मा.ॲड.भगीरथ काका शिंदे यांच्या हस्ते व जनरल बॉडी व कॉलेज विकास समितीचे सदस्य मा.ॲड.संदीप वर्पे यांच्या विशेष उपस्थितीत गुणगौरव करण्यात आला.

मिळालेले हे यश व झालेला सत्कार याबद्दल महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. आर.आर.सानप,उपप्राचार्य प्रा.वर्पे, प्रा.उज्ज्वला भोर,डॉ.अर्जुन भागवत, कार्यालयीन अधीक्षक श्री.सुनील गोसावी यांच्यासह सर्वच शिक्षक शिक्षकेतर सेवकांनी त्यांचे अभिनंदन केले असून सत्काराबद्दल श्री.बांगर यांनी समाधान व्यक्त केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!