
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव : तालुक्यातील कुंभारी येथील समाज बांधवांच्या वतीने आयुष्याभर हातात खराटा घेऊन गावोगाव जाऊन गल्ली बोळ साफ करून स्व:भाषेत किर्तनातून जनतेची मनं साफ करण्याचे ज्यांनी काम केले असे महान संत गाडगेबाबा यांची जयंती रविवार (२५फेब्रुवारी) रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
प्रथम संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन कुंभारी आश्रमाचे मठाधिपती श्री श्री 108 महंत राघवेश्वरानंदगिरीजी महाराज व प्रमुख पाहुणे अनिलभाऊ देसाई आणि गणेशभाऊ बोरुडे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे अध्यक्ष रमण यादव गायकवाड यांच्या समवेत करण्यात आले.

यावेळी बालगोपाळ विराज दिपक वाघ,आदिती दिपक वाघ,कार्तिकी रमन गायकवाड यांसह आदि मान्यवरांनी गाडगे महाराजांबद्दल आपले मनोगत व्यक्त केले तसेच कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुनिल चंदनशिव सर यांनी केले.


यावेळी कुंभारी आश्रमाचे मठाधिपती श्री श्री 108 महंत राघवेश्वरानंदगिरीजी महाराज,प्रमुख पाहुणे अनिलभाऊ देसाई,गणेशभाऊ बोरुडे, कुंभारी सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष रमण यादव गायकवाड, राजुभाई शेख शिवसेना (उ.बा.टा.)तालुका उपाध्यक्ष,सोमनाथ निळकंठ, चंद्रकांत पैठणे गुरु,भास्कर सुरे,विजय जाधव,सुनिल गायकवाड,दिपक वाघ,यशवंत गायकवाड,डॉ.सुयोग पवार,भगवान खळे,पोलिस मित्रसंघटनेचे जिल्हाध्यक्ष विकास खळे,भाऊसाहेब सुडके,नानासाहेब काशिद,एस.टी. महामंडळाचे कर्मचारी,यांसह समाज बांधव,महिला व ग्रामस्त मोठया संख्येने उपस्थित होते.
या पर्वकाळावर कुंभारी येथील समाज बांधवांनी आधिकृत संत गाडगे महाराज प्रतिष्ठान कुंभारी या समाजसेवी संघटनेची घोषणा करून संघटनेचे अध्यक्ष दिपक सूर्यभान वाघ,उपाध्यक्ष रमण खंडू गायकवाड,
खजिनदार निलेश भास्कर गायकवाड,सचिव यशवंत रमण गायकवाड व
सदस्य भानुदास पंढरीनाथ गायकवाड,भास्कर यादव गायकवाड,सुनील बाळू गायकवाड,सुरेश खंडू गायकवाड, विठ्ठल यादव गायकवाड,विजय तुकाराम जाधव,दत्तात्रय अशोक गायकवाड,संतोष लक्ष्मण गायकवाड, उद्धव विठ्ठल गायकवाड,सागर लक्ष्मण गायकवाड यांची निवड केली व शेवटी उपस्थितांचे आभार दिपक वाघ यांनी मानले आणि उपस्थित सर्वांना स्नेहभोजन देण्यात आले.