Homeकोपरगावमान.खा.सदाशिवराव लोखंडे साहेब यांचे विशेष प्रयत्नातून व स्थानिक विकास निधीअंतर्गत कुंभारी येथे...

मान.खा.सदाशिवराव लोखंडे साहेब यांचे विशेष प्रयत्नातून व स्थानिक विकास निधीअंतर्गत कुंभारी येथे राघवेश्वर देवस्थान परीसरास पेव्हर ब्लॉक बसविणे कामाचे भूमीपूजन सोहळा संपन्न

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

कोपरगाव : -शिर्डी लोकसभा मतदार संघात गेल्या दोन पंचवार्षिक पासून भाजपा – शिवसेना युतीचे असलेले लोकप्रिय खासदार मा.सदाशिवराव लोखंडे साहेब यांचे विशेष प्रयत्नातून स्थानिक विकास निधी २५१५ अंतर्गत कोपरगाव तालुक्यातील कुंभारी येथील राघवेश्वर देवस्थान परीसरास पेव्हर ब्लॉक बसविणे फलकाचे अनावरण करून भूमीपूजन सोहळा( दि.५ मार्च) रोजी संपन्न झाला.

यावेळी मा.खासदार लोखंडे साहेबांनी राघवेश्वर महाराजांचे आशिर्वाद घेऊन साईजनार्दन मंदिरातील जनार्दन स्वामींचे व साईबाबांचे दर्शन घेतले आणि उपस्थितांशी बोलतांना म्हणाले कि,खासदार स्थानिक विकास निधी आपल्या गावचे ग्रामदैवत श्री राघवेश्वर देवस्थानच्या परिसर विकासात निश्चितच भर घालणारा असेल,पुढे बोलतांना ते म्हणाले कि,काहींनी जनतेला समोर दिसणारी (शेड,सभामंडपची) कामे करून फलक लावल्याने जनतेला ते दिसते परंतु आम्ही केलेली कामे(खालची)पेव्हर ब्लॉकची आहे त्यावर फलक लावता येत नाही त्याकडे जनतेने लक्ष द्यावे आणि शिर्डी लोकसभा मतदार संघातील जनतेने दोन पंचवार्षिक माझ्यावर ठेवलेला विश्वास कायम राहावा व या पुढेही अशीच विकासाची कामे करण्यासाठी जनतेने मला संधी द्यावी मी त्यासाठी कटीबद्ध राहीन असेही ते शेवटी म्हणाले.

यावेळी जिल्हाप्रमुख-नितिनराव औताडे,उपजिल्हाप्रमुख -देवाभाऊ लोखंडे /मनिल नरोडे/बाळासाहेब राहाणे,तालुकाप्रमुख -रावसाहेब थोरात/संजय गुरसळ,तालुका शेतकरी सेनाप्रमुख -बाबासाहेब बढे,संघटक -मिनानाथ जोंधळे,महिला तालुका प्रमुख -मिनाक्षी वाकचौरे,महिला शहरप्रमुख-आरती गाडे,कुंभारी ग्रामपंचायतचे उपसरपंच- दिलिपराव ठाणगे,संजीवनी कारखान्याचे माजी.संचालक शिवाजीराव कदम,माजी.सरपंच विजयराव कदम,वसंतराव कुलकर्णी गुरू,सोपानराव चिने,ग्रा.सदस्य ललित निळ्कंठ, संजय ठाणगे,रामराव चंदनशिव,ग्रामअधिकारी कहार साहेब,माहेगाव देशमुख माजी.सरपंच बाळासाहेब पानगव्हाणे,प्रभाकर बढे,सुनिल कदम, प्रभाकर कदम,मच्छिद्र कदम,राजेंद्र बढे,ज्ञानदेव कदम,वैभव कुलकर्णी, सागर कदम,रेवणनाथ कदम,शंकर बढे,पोस्टमन-शामशुद्दीन शेख,अरूण (संजय) कदम, अतुल निळकंठ,अभिजित चकोर,नितिन मोहरे,रवि व्हरे, शंकर चंदनशिव यांसह कोपरगाव तालुका शिवसेना,युवा सेना,शेतकरी सेना,महिला आघाडी आदि ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!