Homeकोपरगावजनतेसाठी कोल्हेसाहेब हे " नेते " होते व आमच्या साठी " साहेब...

जनतेसाठी कोल्हेसाहेब हे ” नेते ” होते व आमच्या साठी ” साहेब ” असे ” साहेब ” होणे नाही …. माधवराव पाटील

संपादक – राजेंद्र तासकर

                 कै.साहेबांच्या राख सावडायचा कार्यक्रम झाल्यानंतर,लगेच त्यांच्या आस्थी या साहेबांनी सर्व प्रथम बांधलेल्या गोदावरी नदीवरील हिगंणी बंधाऱ्यात सर्व प्रथम विसर्जन करण्यात आल्या,या आस्थी विसर्जनासाठी मला स्वतः सर्वांचे आवडते खूप साधे सरळ व्यक्तीमत्व असणारे मा.बिपीन दादांनी बोलावून घेतले व त्यांच्या कुटुंबाबरोबर माझ्या ही हस्ते माझ्या साहेबांच्या आस्थी विसर्जन मला करता आल्या,या बद्दल दादांच्या ऋणात राहू इच्छितो वआस्थी विसर्जनानंतर साहेबांबद्दल दोन शब्द बोलायची संधी ही 
दिली.
                या वेळी संजीवनी कारखान्याचे माजी चिफ सिव्हिल इंजिनिअर माधवराव पाटील ज्यांना साहेबांबरोबर काम करता आले,ते म्हणाले की, माजी मंत्री आदरणीय कै.शंकरराव जी कोल्हे साहेब यांनी सर्व प्रथम गोदावरी नदीवर पहिला के.टी.वेअर कोपरगाव तालुक्यात " हिंगणी " येथे१९८८साली बांधण्याचे धाडस करून तो पूर्ण केला.साहेबांनी भविष्यात कोपरगाव तालुक्या तील शेतीच्या पाण्याची टंचाई व वाढती मागणी ओळखून पाणी आडवल्याशिवाय पर्याय नाही व पाणी वाढणार नाही.म्हणून बंधारे बांधण्यास सुरुवात केली. कोपरगाव शहरातील व्यापार, उद्योग वाढावे यासाठी त्यांनी शेतीचे पाणी वाढण्याला महत्त्व दिले व महाराष्ट्रात गोदावरी नदीवर के.टी वेअर बांधणारे पहिले व्यक्ती ठरले.या नंतर साहेबांनी एकुण 3मोठे के.टी. वेअर बांधले.त्या नंतर गोदावरी नदीवर शेवटपर्यंत खूप बंधारे बांधले गेले.छोट्या ओढ्या नाल्यावर ४४ सिमेंटचे दगडी बांधारे बांधले,२७ कच्चे मातीचे बंधारे,९०शेत तळे असे अनेक पाणी अडवण्यासाठी कामे केली. त्याच बरोबर पॉलिटेक्निक व इंजिनिअरिंग कॉलेज साठी जागा घेण्याची व नंतर इमारत बांधण्याची जबाबदारी माझ्या सोपविली. साहेबांनी सोपविलेली जबाबदारी मी त्यावेळी माझे आद्य कर्तव्य समजून पूर्ण केली व आज तिथे मोठे कॉलेज  तालुक्यातील जनतेसाठी उभे आहे. नंतर गोदावरी दूध संघाचे सुरवातीचे काम,माझ्या देखरेखीखाली साहेबांच्या आदेशाने केले. कारखान्यात उभारलेले बायोप्रॉडक्टचे कामे, कारखान्यासाठी पाण्याचे तळे, खिर्डी गणेश सँपकॉमचे फूड प्रोसेसिंग युनिट,येसगाव येथील यशवंत पोल्ट्री स्थापनेपासून चे काम,साईबाबा कॉर्नर ते संजीवनी ते रेल्वे स्टेशन हा जुना रस्ता, तालुक्यातील अनेक रस्ते, इमारती,मंदिरे तसेच संत जनार्दन स्वामी महाराज यांचे समाधी मंदिर,शिव मंदिर,महर्षी शाळा ही सर्व कामे मला आदरणीय कै.कोल्हे साहेब यांचे मार्गदर्शना खाली जे साहेबांना कोपरगाव तालुक्यासाठी करायची होती, ती कामे करता आली व करू शकलो..साहेब स्वतः बांधकामे दर्जेदार व्हावेत यासाठी स्वतः जातीने लक्ष देत...
         जनतेसाठी कोल्हेसाहेब हे " नेते" होते व आमच्यासाठी  "साहेब च " होते. या २४ मार्च ला साहेब हे ९३ वर्षांचे पूर्ण झाले असते. त्यांचा वाढदिवस बघायचा होता.मी ही आत्ता ८३ वर्षांचा झालो आहे.कधी जर साहेबांचा फोन आला तर या वयात ही मी  जागेवरून उठून हा साहेब असे साहेबांचा आदरयुक्त दरारा,प्रेम व धाक आम्ही कधी विसरू शकणार नाही.अश्या या महान नेत्याला,साहेबांना भावपूर्ण आदरांजली,श्रद्धांजली..... 

असे महान व्यक्ती “साहेब ” परत होणे नाही …माधवराव पाटील

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!