Homeकोपरगावकोपरगांव येथे ब्राह्यण सभेच्या वतीने भगवान परशुराम जन्मोत्सव सोहळा मोठया थाटात संपन्न

कोपरगांव येथे ब्राह्यण सभेच्या वतीने भगवान परशुराम जन्मोत्सव सोहळा मोठया थाटात संपन्न

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

कोपरगाव :ब्राह्मण सभा कोपरगावच्या वतीने सालाबादप्रमाणे भगवान श्री परशुराम जन्मोत्सव सोहळा अतिशय उत्साहाने व थाटामाटात संपन्न झाला.

यानिमित्ताने ब्राह्यण सभेच्या सभागृहात ब्राह्यण सभेचे अध्यक्ष श्री. मकरंद कोऱ्हाळकर व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.सुनिता कोऱ्हाळकर,अमोल प्लायवुडचे श्री.नंदकुमार जोशी व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.शिल्पा जोशी, परशुराम ट्रेडर्सचे श्री.राजेश प्रजापती यांच्या शुभहस्ते भगवान परशुरामांचे विधीवत पुजन करण्यात आले.

आलेल्या मान्यवरांचे स्वागत ब्राह्यण सभेचे सचिव श्री.सचिन महाजन यांनी केले.या कार्यक्रमाचे पौरोहीत वेदशास्त्र संपन्न वैभव जोशी आणि सहकारी प्रमोद जोशी,मिलींद चौधरी,मिलींद जोशी यांनी केले.

r

प्रथम मा.आमदार आशुतोषदादा काळे यांचे शुभहस्ते भगवान परशुराम यांच्या प्रतिमेचे पुजन व महाआरती करण्यात आली. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष श्री.मकरंद कोऱ्हाळकर यांनी केले.

या प्रसंगी आमदार आशुतोष काळे यांनी भगवान परशुराम जन्मोत्सवाच्या निमित्तानं सर्वाना शुभेच्छा दिल्या.तसेच ब्राह्यण समाजाला पुढील काळात भरपुर सहकार्य करण्याची ग्वाही सुद्धा दिली.

बांधकाम समितीचे अध्यक्ष तथा प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक प्रसाद नाईक यांनी आभार मानले.श्री.नंदकुमार जोशी यांनी कार्यालय बांधकामासाठी देणगी व श्री.राजेश प्रजापती यांनी बांधकाम साहीत्य दिल्या बद्दल मा.आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

सदर कार्यक्रमास माजी.नगराध्यक्ष संजय सातभाई,माजी.नगराध्यक्षा ऐश्वर्यालक्ष्मी सातभाई,माजी.उपनगराध्यक्ष दत्तात्रय ठोंबरे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनिल गंगुले,अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी काॕग्रेस पक्षाचे अध्यक्ष कृष्णाआढाव,माजी उपनगराध्यक्ष स्वप्निल निखाडे,नगरसेवक मंदार पहाडे,राष्ट्रवादीपक्षाचे पदाधिकारी शहर संघटक विकी जोशी,सुनिल शिलेदार तसेच समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन खजिनदार जयेश बडवे यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ब्राह्यण सभेचे उपाध्यक्ष राजेंद्र जवाद,बी.डी. कुलकर्णी, सहसचिव संदीप देशपांडे,संघटक श्री.महेंद्र कुलकर्णी,श्री. वसंतराव ठोंबरे,श्री.संजीव देशपांडे,डाॕ.मिलींद धारणगांवकर,सौ.वंदना चिकटे,अॕड.सौ.श्रध्दा जवाद,योगेश कुलकर्णी,सदाशिव धारणगांवकर, अजिंक्य पदे आदी पदाधिकारी समाज बांधव यांनी विशेष प्रयत्न केले.

कार्यक्रमाचे शेवटी अल्पोपहार व सरबत आणि प्रसादाचे वाटप करण्यात आले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!