Homeकोपरगावशिक्षण हे वाघीणीचे दुध आहे शिक्षणाने व जिद्दीने मनुष्य मोठा असतो -...

शिक्षण हे वाघीणीचे दुध आहे शिक्षणाने व जिद्दीने मनुष्य मोठा असतो – मा.श्री.झानेश्वर (बापू) परजणे, संचालक

मुख्य संपादक राजेंद्र तासकर

कोपरगाव : तालुक्यातील संवत्सर येथील रयत शिक्षण संस्थेच्या जनता इंग्लिश स्कुलमध्ये दहावी बोर्ड परिक्षेमध्ये प्रथम क्रमांक कु.भक्ती शिवाजी शेटे 95 %,द्वितीय कु.अपूर्वा दत्तात्रय गायकवाड 92 %, व तृतीय कु.समीक्षा सचीन भाकरे 85 % मार्क मिळविल्याबद्दल गुणवंत विद्यार्थीनींचा सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे साहेब सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक मा.श्री.ज्ञानेश्वरबापु परजणे यांच्या हस्ते शाल,श्रीफळ व पूष्पगुच्छ देऊन यशोचित सत्कार करण्यात आला.

यावेळी संजीवनी पतसंस्थेचे व्हा चेअरमन श्री.राजेंद्र परजणे,भाजपा दिव्यांग सेलचे जिल्हाध्यक्ष तथा संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य अहमदनगर जिल्हाध्यक्ष श्री.मुकुंद मामा काळे,संवत्सर ग्रामपंचायत विद्यमान सदस्य श्री.महेशदादा परजणे,सौ.छायाताई मुकुंदमामा काळे, श्री. अनिलभाऊ शेटे,श्री.सचिन भाकरे,श्री.शिवाजीराजे शेटे,सौ.अर्चनाताई शिवाजीराव शेटे,संवत्सर पोस्टातील पोस्टमन दत्तात्रय गायकवाड, सौ. दिपालीताई दत्तात्रय गायकवाड आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी गुणवंत विद्यार्थीनींनी सत्काराला उत्तर देतांना सांगितले की, ज्या शिक्षकांनी आम्हाला आई – वडिलांच्या प्रमाणे अध्ययन केले, त्यांच्या आम्ही सदैव ऋणात राहू,या पुढेही घराचे व गावचा नावलौकीक वाढवण्याचा मनापासून प्रयत्न करू.

याप्रसंगी कारखान्याचे संचालक श्री.ज्ञानेश्वर बापु परजणे आपल्या आशिर्वादरूपी शब्दात म्हणाले की, मुलींनो खूप शिक्षण घ्या,शिक्षणातून मोठे व्हा तुमच्यातील कोणी डॉक्टर, वकील,इंजिनीयर यासारख्या अनेक पदावर जाउन आपल्या गावासह तालुक्याचे नाव मोठे करा.मुलांनो शिक्षण हे वाघीणीचे दुध आहे शिक्षणाने व जिद्दीने मनुष्य मोठा होत असतो. या जगामध्ये शिक्षण नसेल तर मनुष्याला काडीची किंमत राहत नाही.आपण आपल्या गावाकरिता भविष्यात काही तरी करावं अशी अपेक्षा नेहमी आपल्या मनात ठेवा आणि वाटचाल करा असे बोलून सर्व मुलींना शुभेच्छा देऊन प्रत्येक मुलींना अशोक वृक्षाचे एक रोप सत्कार प्रसंगी देण्यात आले. त्याचप्रमाणे श्री.मुकुंद मामा काळे यांनी सर्व विद्यार्थ्यांना पेन, डायरी आणि जनरल नॉलेजचे पुस्तक भेट देत सत्कार करून विद्यार्थ्याचा आनंद द्विगुणीत केला तसेच कोपरगाव तालुक्याच्या प्रथम महिला आमदार सौ. स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे साहेब व सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे साहेब सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.श्री.विवेकभैय्या बिपीनदादा कोल्हे साहेब यांनी फोन वरून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री.रमेश मोरे सर,वर्गशिक्षक श्री.सुनील वाघमारे,पर्यवेक्षक श्री.शरद आंबिल्वदे,श्री.भगवान शिंदे,श्री.रमेश दाणे,श्री. निवृत्ती तायडे,श्री.अनिल बनसोडे,श्री.प्रदीप भोये,श्री.गणेश आंबरे सर यांचे विशेष मार्गदर्शन मिळाले त्याबद्दल त्यांचेही या वेळी आभार मानण्यात आले.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्य श्री.महेश परजणे यांनी केले तर शेवटी श्री.दत्तात्रय गायकवाड आणि श्री.राजेंद्र परजणे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!