Homeकोपरगावडी पॉल पब्लिक स्कूलची नवीन शैक्षणिक वर्षाची उत्साहात सुरुवात

डी पॉल पब्लिक स्कूलची नवीन शैक्षणिक वर्षाची उत्साहात सुरुवात

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

कोपरगाव : कोपरगाव येथे साईसिटी परिसरात नव्याने सुरू झालेल्या डी पॉल पब्लिक स्कूलमध्ये शाळेच्या नवीन शैक्षणिक वर्षाची प्राचार्य फादर जॉमी जोसेफ यांच्यासमवेत विद्यार्थीनींच्या हस्ते दिप प्रज्वलन करून उत्साहात सुरुवात करण्यात आली.

यावेळी प्राचार्य फादर जॉमी जोसेफ यांनी उपस्थित विद्यार्थ्यास मार्गदर्शन करुन सर्व विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्ष आनंददायी व निरोगी जावे यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या.त्याचबरोबर आलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले.यावेळी विद्यार्थी,बंधु -भगिनी,माता,पालक मोठया संख्येने उपस्थित होते.

सी.बी.एस.सी चे शिक्षण देणारी एक नवीन शाळा कोपरगाव येथील साई सिटी परिसरात सुरू झाली असल्याने मुलांचे अॅडमिशन घेण्यास पालक वर्गात उत्साह निर्माण झाला असल्याचे पहावयास मिळत आहे.या शाळेने फारच कमी कालावधीत स्वतःचा नाविण्य पूर्ण नावलौकिक मिळविला आहे.

सदर प्रसंगी फादर अल्विन व शाळेचे उपप्राचार्य पृथ्वीपाल यांनीही विद्यार्थ्यास मार्गदर्शन करून नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.स्नेहल साळवे यांनी केले तर सौ.स्वाती गिरमे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!