
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव : कोपरगाव नगरपालिकेच्या येसगाव येथील ५ नंबर साठवण तलावाच्या चारी बाजूला काँक्रिटीकरणाचे भिंत उभी केली.परंतु तळामध्ये मातीची भर व प्लास्टिकचा कागद टाकून ते काम पूर्णत्वाकडे नेत आहात. याबाबत काँक्रिटीकरण तळात का नाही याचा खुलासा जनतेला नगरपालिकेने करावा असे माजी.नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी आपल्या प्रसिध्दि पत्रकात म्हटले आहे.

श्री..पाटिल पुढे म्हणाले की,दुसऱ्या ठिकाणाहून पाणी या तळ्यामध्ये खालून सध्या आत येत आहे.याचा अर्थ लिकेजेस / पर्क्युलेशन निश्चित होत आहे.आणि जर पाणी आत येत असेल तर निश्चित ५ नंबर चे तळे पूर्ण भरल्यानंतर सुद्धा पाण्याच्या दाबाने पाणी बाहेर पण परकुलेट होऊ शकतं.असे होऊ नये यासाठी नगरपालिकेने ५नंबर तळ्याच्या तळात कॉंक्रीटीकरणच करायला हवे होते ते का केले नाही ? याचा खुलासा जनतेला नगरपालिकेने द्यावा.

५नंवर साठवण तळ्याच्या तळात काँक्रिटीकरणा ऐवजी खालच्या भागात काही ठिकाणी मातीची भर टाकली,त्यावर वाळू/बारीक क्रश आर्टिफिशल खडी टाकली व त्या खडीवर प्लास्टिकचा कागद टाकून वर त्यावर परत मातीचा मोठा थर दिलाय. तर काही भागांमध्ये बारीक खडीमुळे कागद फाटेल म्हणून काही भागांमध्ये बारीक खडी/वाळू न टाकता पूर्ण मातीचाच लेअर दिलेला दिसतोय.

तसेच पाणी दुसऱ्या तळ्यामधून या तळ्यात खालून कुठून येतं ते बंद करणं गरजेचं होतं तसे न करताच पोकलेन मशीन व ट्रॅक्टरने ते पाणी झाकून देऊन त्यावर काम चालू केलेले असल्याचे ही श्री.पाटील यांनी म्हटले आहे.

पुढे श्री.पाटील म्हणाले कि,आधीच कोपरगावकर गढूळ व अस्वच्छ पाण्यासाठी व ५ दिवसाआड, आठवड्यातून एकदा,१५ दिवसातून एकदा तर २५ दिवसातून एकदाच पाणी असं त्रास या जनतेने सहन केला आहे. कोपरगाव शहरातील सर्वांनी भोगलेला आहे आणि भोगत आहे. अजूनही वेळ गेलेली नाही शहरवासियांनी वेळीच नगरपालिका प्रशासनाला जाब विचारुन संबधित ठिकाणी पहाणी करुन योग्य काम करून घ्यावे.
सदर ठिकाणी खालून जर मातीचा पाण्यामुळे गाळ झालेला आहे,तर त्याचं कॉम्पॅक्शन होऊ शकणार नाही आणि मग तसाच कागद आणि नुसती माती वर कॉम्पेक्षण न करता.अशा पद्धतीने माती पक्की होईल का ?तसेच जो प्लास्टिकचा कागद टाकला आहे त्याचे जॉईंट बरोबर जोडलेत का ? आणि तळ्याच्या सर्व चारी कडेच्या बाजूला तो कागद आणि भिंत यातला गॅप चांगल्या प्रकारे बुजल का ? तळ्याचे कशाप्रकारे काम केले याचा पण ऑडिट होणे गरजेचे आहे.असे अनेक प्रश्न श्री.पाटील यांनी उपस्थित केले आहे. अन्यथा हे तळे पूर्ण झाल्यानंतर जर लिकेज राहिले तर मोठ्या प्रमाणात तर जनतेला परत पाण्याचा त्रास सहन करावा लागणार यात शंका नाही अशीही चिंता त्यांनी व्यक्त केली आहे.
सदर तळ्यात तळाला हार्ड रॉक होता काही ठिकाणी कडक मुरुम ही होता. यासाठी काँक्रिटीकरणच खालच्या तळाला करणे गरजेचे होते असे न करता कागद टाकायचा हे कोणत्या आधारे नगरपालिकेने ठरवले.कारण तळ्यामध्ये मत्स्य व्यवसाय ही नगरपालिका करायला देते आणि जर त्यात खेकडे असले तर ते खेकडे मातीतून तो प्लास्टिकचा कागद सहज कुरतोडतील व यामुळे पाणी पूर्वीप्रमाणे इतरत्र जाण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
तरी नगरपालिकेने व जनतेने तिथं जाऊन अजून सुद्धा बघू शकता की पाणी कसं पर्कुलेट होतंय आणि तळातील काम कागद व माती व बॉर्डर भिंतींच्या आतला कागद ते भिंत कसं बंद करणार आहेत ? किंवा जॉईंट करणार आहे यावर लक्ष देऊन याबाबत या जनतेच्या मनातील शंका निरसन कराव्यात.परत परत निधी मिळत नसतो आधीच खूप वर्षे जनतेला पाण्या वाचून खूप हाल सोसावी लागली आहे.
हे नवीन तळ्याचे काम होते म्हणून माती व प्लास्टिकचा कागद न वापरता काँक्रिटीकरण जर केले असते तर पाणी लिकेज झाले नसते व कॅनल मधून तळ्यात आलेला गाळ हा काढता आला असता,परंतु खाली जर माती टाकली तर भविष्यात तो गाळ काढणार कसा ?.तरी तातडीने यावर योग्य तो खुलासा व कारवाई व्हावी ही नगरपालिकेला माजी. नगराध्यक्ष श्री.मंगेश पाटील यांनी शेवटी विनंती केली आहे.