
उपसंपादिका कै.सौ.नलिनी प्रभाकर सूर्यवंशी यांच्या स्मरणार्थ
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव : – कै.सौ.नलीनी प्रभाकर सूर्यवंशी उपसंपादिका धुळे यांच्या २७ जून हा स्मृतीदिनाच्या निमित्ताने गृहीणीपद सांभाळून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या नारी शक्तीचा गौरव म्हणून ९ कर्तबगार महिलांना अभिनव खान्देश प्रेरणादायी व जीवनगौरव राज्यस्तरीय पुरस्कार आज जाहीर करण्यात आला असल्याची माहिती संस्थापक संपादक प्रभाकर सुर्यवंशी यांनी दिली आहे.

संसारिक जबाबदारी पार पाडण्यासाठी आपल्या वैयक्तीक छंद,आवडीला बाजुला सारुन यशस्वी संसार करणार्या धर्मपत्नी कै.सौ.नलिनी सूर्यवंशी यांच्या ४थ्या स्मृतीदिना निमित्त त्यांच्या साहित्याप्रती आवड म्हणून आपली गृहीणीपदाची जबाबदारी सांभाळून वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्या राज्यभरातील ९ कर्तृत्ववान महिलांची या पुरस्कारासाठी संपादकीय मंडळाने एकमताने निवड केली आहे.यामध्ये येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल सारख्या ग्रामीण भागात राहणाऱ्या शेतकरी कुटुंबातील महिला तसेच सहकारमहर्षी शंकरावजी कोल्हे सहकारी साखर कारखान्यातील कर्मचारी संजय वाघ व साहित्यिक प्रशांत वाघ यांच्या मातोश्री श्रीमती अंजनाबाई शहादू वाघ यांना ” अभिनव खांदेश प्रेरणादायी महिला राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्या निमित्ताने त्यांच्यावर कौतुकाची थाप पडली असून, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे तसेच कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या पहिल्या महिला आमदार सौ. स्नेहलताताई कोल्हे यांनी शुभेच्छा देऊन त्यांचे कौतुक केले आहे.
अभिनव खांदेश प्रेरणादायी महिला राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्काराचे स्वरुप- आकर्षक ट्रॉफी,मानाची शाल, दर्जेदार प्रमाणपत्र तसेच बुके ऐवजी बुक (पुस्तक) देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान सोहळा लवकरच धुळे येथे आयोजित होणार आहे.असे संस्थापक संपादक प्रभाकर सूर्यवंशी यांनी जाहीर केले आहे.