Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे सर्वप्रथम…… येथील महिलांच्या खात्यावर जमा होताच महिलांमध्ये...

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे सर्वप्रथम…… येथील महिलांच्या खात्यावर जमा होताच महिलांमध्ये आनंदाचे वातावरण -अनुपभैय्या शहा

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

फलटण प्रतिनिधी -महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री मा.ना अजितदादा पवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात महिलांसाठी सर्वात मोठी व महत्वकांक्षी घोषणा जी केली ती म्हणजे ” मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ” महायुती सरकाने घोषीत करून सर्वप्रथम फलटण शहरातील महिलांच्या खात्यावर प्रत्येकी ३०००रुपये तात्काळ जमा केल्याने महिला वर्गात आनंदाचे वातावरण पहावयास मिळत असल्याने माउली फाऊंडेशनचे अध्यक्ष अनुपभैय्या शहा यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री तसेच महायुती सरकार यांचे मन :पूर्वक आभार व्यक्त केले आहे.

मुख्यमंत्री लाडली बहीण योजनेमध्ये सर्वात प्रथम फलटण शहर भाजप व माऊली फाउंडेशनच्या माध्यमातून अनुपभैय्या शहा यांनी फॉर्म भरण्याचा कँम्पचे आयोजन करून ८०० महिलांचे अत्यंत काळजीपूर्वक आलोक शहा यांच्या मार्गदर्शनाखाली अभिजित मठपती,माऊली फाऊंडेशनच्या सर्व सदस्य व विश्वस्त यांनी मोफत भरून वेळेत जमा केल्याने सर्वात प्रथम ८००पैकी ८०० महिलांना प्रत्येकी ३००० रुपये प्रमाणे त्यांच्या बँक खात्यावर जमा झाले आहे.

महिला वर्गाकडुन फलाटण शहर भाजप व माऊली फाउंडेशन यांचे तसेच विशेष म्हणजे अनुपभैय्या यांना महिला पैसे खात्यावर जमा झाल्याचा स्क्रीन शॉट शेअर करून आभार व्यक्त करत आहेत. सुजान आणि जागृक सामाजिक कार्यकर्ता म्हणून अनुपभैय्या यांच्यात हीच खरी ख्याशियत असल्याचे महिला वर्गातून बोलले जात आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!