Homeकोपरगाववारी व हनुमानवाडी येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या दोन शाखांचे...

वारी व हनुमानवाडी येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या दोन शाखांचे उद्घाटन सोहळा उत्साहात संप्पन्न

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

कोपरगाव : – आरपीआय आठवले पक्षाचे तालुकाअध्यक्ष अनिल रणनवरे यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले ) पक्षाची कोपरगाव तालुक्यातील वारी तसेच हनुमानवाडी या दोन शाखा फलकांचा अनावरण सोहळा जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला.

या वेळी राज्यसचिव दीपकराव गायकवाड,शहराध्यक्ष सोमनाथ लोहकरे, मातंग जिल्हाध्यक्ष मोहन आव्हाड,श्रीरामपूर शाराध्यक्ष विजय पवार, बेलापूर ग्रामपंचायत सदस्य रमेश अमोलिक,रशिद शेख,मुस्लिम आघाडी तालुकाध्यक्ष पप्पू सैय्यद, तालुका उपाध्यक्ष किशोर मैन्द, शहर उपाध्यक्ष अनिस शेख,तालुका उपाध्यक्ष अकील शेख,शहर उपाध्यक्ष अजीत कुशर, शहर उपाध्यक्ष अमोल थोरात,मुस्लिम आघाडी शहरउपाध्यक्ष अस्लम शेख, शुभम भालेराव आदी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की, गेल्या आठ दिवसापूर्वीच आरपी आय मुस्लिम आघाडीची स्थापना करण्यात आली.कोपरगाव शहरात तर गेल्या वर्षभरात तेरा ते चौदा शाखेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष अनिल रणनवरे यांचे भरभरून कौतुक केले.

पुढे बोलतांना ते म्हणाले कि.अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा मोठा गुन्हेगार असतो.आपण कुणावर अन्याय करायचा नाही आणि कोणी अन्याय करत असेल तर सहन करायचा नाही तर रिपाई हा सर्व जाती धर्माला सोबत घेऊन चालणारा पक्ष आहे तर आपला रिपाई परिवार सदैव अन्याय अत्याचाराच्या विरोधात तुमच्या पाठीशी खंबीर पणे उभा राहिल असे जाहिर आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

यावेळी आयोजक म्हणून राजवाडा प्रतिष्ठान,तथागत तरूण मंडळ, पंचशील तरुण मंडळ,लैब्यक ग्रुप तसेच हनुमानवाडी येथील संघर्ष तरुण मित्रमंडळ यांनी मोलाचे सहकार्य करुन मान्यवरांचे आभार मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!