
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव : कळविण्यात अत्यंत वाईट वाटते कि,येवला तालुक्यातील अंदरसुल येथील प्रगतशिल शेतकरी कै.कोंडाजी रावजी घोडके यांना बुधवार दि.१३ नोव्हेंबर २०२४ रोजी वयाच्या १०४ व्या वर्षी देवाज्ञा झाली. ते अखिल भारतीय श्री संत सावता माळी युवक संघ कोपरगाव तालुकाध्यक्ष श्री.अशोकराव माळवदे यांचे आजोबा होते.अशी माहीती श्री.मुकुंद मामा काळे जिल्हाध्यक्ष उत्तर अ.नगर अखिल भारतीय श्री संत सावता माळी युवक संघ यांनी दिली.त्यांच्या मागे पाच मुले,मुली, सुना, नातवंड असा मोठा परिवार आहे.

ह.भ.प.कै.कोंडाजी घोडके हे धार्मिक प्रवृत्तीचे असल्याने त्यांनी स्वतःच्या शेतजमिनीत नंदकेश्वर महादेवाचे भव्यदिव्य मंदिराची उभारणी करून त्या ठिकाणी नित्यनेमाणे पुजा पाठ करूनच आपली दिनचर्याला सुरुवात करत असे म्हणूनच त्यांच्या आठवणी कायमस्वरूपी स्मरणात रहावे यासाठी कुटुंबातील व्यंक्तींनी त्यांची रक्षा विसरर्जन नदीत न करता शेतातील मंदिरासमोर खड्डे घेऊन रक्षा टाकत त्यामध्ये वेगवेगळी झाडे लावून सर्वांनी त्याची जोपासणा करण्याचा संकल्प केला आहे.
त्यांचा दशक्रिया विधी शुक्रवार दि.२२ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ठिक.९ वाजता घोडके वस्ती सायगाव रोड (शंकरवाडी) अंदरसुल ता.येवला,जि. नाशिक येथे होईल याची सर्वांनी नोद घ्यावी.दशक्रिया निमित्त ह.भ.प. नरेंद्र महाराज चिखल ओव्हळकर यांचा सकाळी ९ ते ११ या वेळेत किर्तन श्रवणाचा सर्वांनी लाभ घ्यावा.
त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना व भावपूर्ण
श्रध्दांजली
॥ ओम शांती ॥ ओम शांती ॥ ओम शांती ॥
शोकाकुल : – ग.भा.लहानबाई सोपान माळवदे,गं.भा.केसरबाई भागीनाथ सोनवणे,कै.गंगुबाई बन्सीलाल बनकर, भगवान कोंडाजी घोडके, पंढरीनाथ कोंडाजी घोडके,दत्तात्रय कोंडाजी घोडके,निवृत्ती कोंडाजी घोडके,ज्ञानेश्वर कोंडाजी घोडके.