
मुख्य संपादक – राजेंद्र तासकर
कोपरगांव : तालुक्यातील कुंभारी येथील कै.सोमनाथ महादू घुले यांच्या वारस पत्नी श्रीमती सुनिता सोमनाथ घुले यांना सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखाना कामगार पतपेढीने न्यू इंडिया इन्शोरन्स कंपनीच्या वतीने उतरवलेल्या जनता अपघाती विमा योजनेचा पाच लाख रूपयाचा विमा धनादेश कारखान्याचे उपाध्यक्ष श्री मनेशजी गाडे साहेव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
त्या प्रसंगी बोलतांना उपाध्यक्ष श्री. मनेशजी गाडे साहेब म्हणाले कि, विमा ही काळाजी गरज आहे माजी मंत्री स्व.शंकररावजी कोल्हे यांच्या दुरदर्शी विचारांचा वारसा घेऊन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष मा.श्री. बिपिनदादा कोल्हे साहेब कारखान्याचे अध्यक्ष मा.श्री. विवेकभैय्या कोल्हे साहेव यांनी कारखान्याचे सर्व सभासद व कामगारांसाठी न्यू इंडिया इन्शोरन्स कंपनीकडुन जनता अपघात विमा योजना उतरवलेली आहे. अडचणीच्या काळात त्याचा मोठा आधार ठरला आहे. कोल्हे सहकारी साखर कामगार पतपेढीच्या ३२९ विमा धारकांना आजवर ७३ लाख ३७ हजार रूपयांची मदत यातुन करण्यात आली आहे. कै.सोमनाथ महादु घुले हे सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे कर्मचारी व साखर कामगार पतपेढीचे सभासद होते. दि.१७ जून २o२३रोजी वयाच्या ५४ व्या वर्षी अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याने आवश्यक त्या कागदपत्रांची पुर्तता पतपेढीच्या वतीने करण्यात आली. त्यांच्या वारस पत्नी श्रीमती सुनिता सोमनाथ घुले यांना पाच लाख रूपयांचा धनादेश मिळवुन देण्यात आला.
याप्रसंगी कारखान्याचे संचालक श्री रमेश दादा घोडेराव साहेब,श्री.राजेंद्र निवृत्ती कोळपे साहेब,कामगार पतपेढीचे अध्यक्ष श्री साईनाथ पंढरीनाथ तिपायले,व्यवस्थापक श्री. राजेंद्र दादा सोनवणे,श्री.भालचंद्र आनंदा कदम,श्री सुनिल ज्ञानदेव कदम, श्री संतोष शिवाजी चौधरी,श्री. दत्तू निवृत्ती चिने,श्री.योगेश पाठक आदी उपस्थित होते.