Homeकोपरगावकोणी आमदार पाहिलेत का कोपरगांवचे आमदार ? - नितीन शिंदे

कोणी आमदार पाहिलेत का कोपरगांवचे आमदार ? – नितीन शिंदे

एकच जनता दरबार घेऊन तक्रारींचा ढिग व महापुर बघून जनतेला समस्यांच्या वाऱ्यावर सोडून आमदार काळे गायब – नितीन शिंदे,प्रदेश सचिव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

कोपरगाव : – विधानसभेत आयतेच जांभूळ तोंडांत पडल्याने त्याची किंमत नसणारे आमदार आशुतोष काळे हे बोटावर मोजण्या एवढे देखील तास मतदारसंघात थांबले नाही हे दुःखद आहे.एकीकडे कोपरगाव शहरातला पाणी पुरवठा समस्या वाढीस आहे.तालुक्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. नागरिकांना समस्या भेडसावत आहे. पोहेगाव सारख्या ठिकाणी भर दिवसा दरोडा पडला त्यानंतर अद्याप देखील आमदार उजेडात आलेले नाहीत. प्रत्यक्षात आमदार म्हणून आशुतोष काळे हे निर्धास्तपणे वागत असल्याची टीका काँग्रेसचे नेते नितीन शिंदे यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

प्रसिद्धीपत्रकात श्री.शिंदे पुढे म्हणाले कि, महाविकास आघाडीने कमी काळात टोकाची लढाई दिली, राष्ट्रीय नेते शरदचंद्र पवार यांच्या निवडूक प्रचारसभा दरम्यान कोपरगांवातील भव्य सभा व जनतेचा कल बघून काळे यांची धावपळ वाढवणारी कुणाच्या हि नजरेततून सुटली नाही. पण,कोल्हे यांच्या मदतीने काळे यांना निवडणूक विजयाचे फळ चाखता आले अन्यथा निकाल अनपेक्षित लागला असता याची त्यांना जाणीव आहे. आता निवडणूक संपली त्यामुळे पुन्हा जनतेला गृहीत धरून वागणे त्यांचे सुरू आहे. ते सत्तेची ऊब घेत आहे मात्र जनतेला आता समस्यांच्या कडाक्यात उभे केले आहे हे त्यांनी विसरू नये.

मतदारसंघात समस्यांचा डोंगर झाला आहे. निदान ज्या कोल्हे कुटुंबाने काळे यांची बाजु घेऊन विधानसभा सदस्य म्हणून निवडुन आणले त्यांनी तरी आता काळे यांना जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी रेटा लावावा अन्यथा सामान्य जनता सहमतीच्या राजकीय वाटचालीत भरडली जाईल हे सत्य आहे. मागील पाच वर्षात अक्षरशः जनतेची पिळवणूक,अवैध धंदे तेजीत अशी वाईट परिस्थिती होती. शासकिय कार्यालयात सामान्य जनतेची पिळवणूक,शेतीचे अंतरलेले पाटपाणी व चारी दुरूस्ती,विज खोळंबा, रोहित्र दुरूस्ती व इतर समस्यांचा ढिग साचला आहे. निवडणूक निकाल लागून दोन महिने उलटून गेले तरीही अद्याप आमदार जनतेला एक जनता दरबार सोडला, तर पुन्हा नजरेस पडले नाही ही शोकांतिका असल्याचेही श्री. शिंदे यांनी म्हटले आहे.

पुढे ते म्हणाले,तालुक्यात राजरोज घडणारे गुन्हे, चोऱ्या यामुळे नागरिक त्रस्त असून आमदार मात्र डोळ्यावर गांधारीची पट्टी बांधून कृती पासून निद्रिस्त आहे. असेच सुरू राहिले तर भविष्यात “कोणी आमदार पाहिले का आमदार ” अशी म्हणायची वेळ जनतेवर येईल असा खरपूस समाचार
नितीन शिंदे, प्रदेश सचिव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांनी घेतला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!