Homeकोपरगावकोकमठाण सोसायटीत काळे कोल्हे युतीचा विजय

कोकमठाण सोसायटीत काळे कोल्हे युतीचा विजय

संपादक – राजेंद्र तासकर
तालुक्यातील राजकीयदृष्टया महत्वाच्या असलेल्या कोकमठाण सहकारी सोसायटीच्या पंचवार्षीक निवडणुकीत कोल्हे गटाचे आठ तर काळे गटाचे पाच असे तेरा उमेदवार विजयी झाले आहेत. प्रतिस्पर्धी शिवसेनेचा दारूण पराभव झाला.निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून सहायक निबंधक एन जी ठोंबळ यांनी काम पाहिले तर त्यांना सहायक म्हणून सचिव आर डी दातीर यांनी सहकार्य केले.
विजयी उमेदवारात दगुनाथ गायकवाड,रामभाउ रक्ताटे,शरद थोरात,सुकदेव वाघ,आण्णासाहेब लोहकणे, कालिदास धिवर,शिलाबाई वाल्मीक लोंढे,वाल्मीक बिडवे सर्व कोल्हे गट तर विजय रक्ताटे, संजय देशमुख,आप्पासाहेब लोहकणे,भागिरथीबाई पुंजा पवार,विलास आव्हाड सर्व काळे गट यांचा समावेश आहे.ही निवडणुक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी अशोकराव केंदळे, आर एन.रहाणे,बी.डी. पानगव्हाणे यांनी केंद्राध्यक्ष म्हणून काम पाहिले.विजयी उमेदवारांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!