
संपादक -राजेंद्र तासकर
जगातील अनेक तीर्थक्षेत्रांपैकी जागतिक किर्तीचे व दर्जाचे आणि जगाच्या कानाकोपऱ्यात ओळखली जाणारी साईबाबांची भूमी म्हणजे शिर्डी होय.
अहमदनगर जिल्हयातील शिर्डी नगरीत साईबाबांनी स्वतः सुरु केलेल्या रामनवमी हा उत्सव याही वर्षी विविध धार्मिक कार्यक्रमांसह मोठया जल्लोषात व आनंदाने साजरा केला जाणार आहे. यानिमित्ताने जगभरातून येणाऱ्या भाविकांची मांदीयाळी मोठया प्रमाणात असते त्यांच्या इच्छा अकांक्षा साईबाबा पूर्ण करतात व होतात.
अशाच प्रकारे काही भाविक भक्त गेली ११ वर्षापासून विविध संगमाच्या ठिकाणी सायकलवर जाऊन (तीर्थ) गंगाजल आणतात व त्या तीर्थाने साईबाबांना रामनवमीच्या दिवशी स्नान घातले जाते. सालाबादप्रमाणे याही वर्षी अमरकंठ ते शिर्डी ११००कि.मी चा सायकल प्रवास करून गंगाजल आणण्यासाठी नाटेगाव येथून नितिन मोरे, सतिष मोरे, रामनाथ मोरे, सागर मोरे, अमित मोरे, सोमनाथ वर्पे, खंडु मोरे,भास्कर मोरे,दत्तु जटारे विकास मोरे,प्रभाकर मोरे,राजू मोरे, तर दत्तु खोकले, शांताराम भोरकडे पिंपळगाव येथून आणि निमगाव येथून शिवाजी लभडे रवाना झालेले आहेत. साईबाबा त्यांची मनोकामना पूर्ण करो