Homeकोपरगावजेष्ठ नागरिक सेवा मंचच्या वतीने वृक्षारोपण संपन्न

जेष्ठ नागरिक सेवा मंचच्या वतीने वृक्षारोपण संपन्न

कोपरगाव – येथील जेष्ठ नागरिक सेवा मंच, जेष्ठ महिला समितीच्या वतीने जेष्ठ महिला समितीच्या अध्यक्षा, श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयाच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका रजनीताई गुजराथी यांच्या वाढदिवसानिमित्त तहसीलदार महेश सावंत, उपमुख्याधिकारी पापडीवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले.इनडोअर गेम हाॅल नजीकच्या जेष्ठ नागरिक सेवा मंचच्या कार्यालयाजवळ वृक्षारोपण करण्यात आले.

याप्रसंगी आनंद ऋषी नेत्रालय अहिल्यानगर यांच्या सहकार्याने मोतीबिंदू तपासणी व उपचार शिबिर आयोजित करण्यात आले होते शहर व ग्रामीण भागातील अनेक लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तहसीलदार महेश सावंत यांच्या हस्ते रजनीताई गुजराथी यांचा सत्कार करण्यात आला.

समारंभासाठी मंचच्या अध्यक्षा सौ सुधाभाभी ठोळे, सुतारताई, कार्याध्यक्ष विजय बंब, ऊत्तमभाई शहा, पेंटर महंमद दारुवाला, जवाहर शेठ शहा, सी आर बजाज सर, योगेश जोबनपुत्रा, सिद्धार्थ मेहेरखांब, हेमचंद्र भवर, डॉ देवकर (अहिल्यानगर),एड. योगेश कोळगे, प्रमोद येवले ,प्रगतशील शेतकरी सुरेश कोल्हे आदी मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!