
कोपरगाव : – संजीवनी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल श्रीमान गोकुळचंदजी विद्यालय कोपरगावचे सन १९८५- ८६ बॅच चे माजी विद्यार्थी श्री. राजेंद्र सखाहरी परजणे यांचा विद्यालयाच्या वतीने श्रीफळ, शाल व पुष्पगुच्छ देऊन नुकताच यथोचित सत्कार करण्यात आला असल्याची माहीती आमच्या प्रतिनिधीस भाजपा दिव्यांग सेल कोपरगाव तालुकाध्यक्ष श्री. मुकुंद मामा काळे यांनी दिली.
जिल्ह्यातील नामांकित संजीवनी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी मा. श्री. राजेंद्रजी परजणे व उपाध्यक्षपदी मा. श्री. संदीपजी गुरुळे यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली. यानिमित्ताने कोपरगाव एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव सन्माननीय श्री. सचिनजी अजमेरे यांच्या हस्ते विद्यालयात सत्कार समारंभ संपन्न झाला.

सत्कार मुर्ती सत्कारास उत्तर देतांना म्हणाले कि, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष मा. श्री. बिपीनदादा कोल्हे माजी. आमदार.स्नेहलताताई कोल्हे आणि युवा नेते मा. श्री.विवेकभैय्या कोल्हे यांनी माझ्यावर टाकलेला विश्वास आणि दिलेली जबाबदारी मी आपल्या सर्वांच्या सहकाऱ्यांने पूर्णत्वास नेण्याचा आटोकाट प्रयत्न करीन व विद्यालयाच्या वतीने माझा यथोचित सत्कार करण्यात आला त्याबद्दल मी विद्यालयाचा व सर्व शिक्षकवृंदांचा ऋणी राहिल.
या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री. कैलासजी ठोळे, चेअरमन श्री. चंद्रकांतशेठ ठोळे, सचिव श्री. दिलीपजी अजमेरे, डॉ. अमोलजी अजमेरे, श्री. संदीपजी अजमेरे,श्री. राजेशजी ठोळे यांनी माजी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.लकारे सर, उप मुख्याध्यापक श्री.अमृतकर सर, पर्यवेक्षक श्री.उल्हारे सर, श्री.तुपसेंदर सर, माजी मुख्याध्यापक श्री. कोऱ्हाळकर सर, कलाशिक्षक श्री. कोताडे सर, श्री.जाधव सर,श्री. गाडेकर सर यांसह विद्यार्थी – विद्यार्थीनी व सर्व स्टाप उपस्थित होते.