Homeकोपरगाव"एक राखी जवानांसाठी " या उपक्रमात जनता इंग्लिश स्कुल संवत्सरच्या विद्यार्थीनींनी घेतला...

“एक राखी जवानांसाठी ” या उपक्रमात जनता इंग्लिश स्कुल संवत्सरच्या विद्यार्थीनींनी घेतला सहभाग

कोपरगाव : – संजीवनी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.विवेकभैय्या बिपीनदादा कोल्हे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या तीन -चार वर्षापासून “एक राखी जवानांसाठी ” या उपक्रमाअंतर्गत दरवर्षी भारत देशाचे सीमेवर सीमा सुरक्षा करणाऱ्या जवानांसाठी राबविण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत शिर्डी ते जम्मू काश्मिर पर्यंत राख्या संकलन करण्यात येत आहे. या सारखे अनेक उपक्रम राबविण्याच्या पवित्रा संजीवनी उद्योग समुह व संजीवनी युवा प्रतिष्ठान यांनी हाती घेतला आहे.

” एक राखी जवानांसाठी ” या उपक्रमात जनता इंग्लिश स्कुल संवत्सरच्या विद्यार्थीनींनी सहभाग घेऊन ४५० राखींचे शाळे मध्ये संकलन करून खारीचा वाटा उचलला असून संकलन केलेल्या राख्या जम्मू काश्मिर येथे पोहचविण्यासाठी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक श्री. ज्ञानेश्वर बापु परजणे, श्री.बापुसाहेब बाराहाते, संजीवनी सहकारी पतसंस्था चेअरमन श्री. राजेंद्र परजणे, कोपरगाव, स्थानिक सल्लागार समिती ज्येष्ठ सदस्य श्री. अशोकराव लोहकने, भाजपा दिव्यांग सेल कोपरगाव तालुकाध्यक्ष श्री. मुकुंद मामा काळे, संवत्सर ग्रामपंचायत विद्यमान सदस्य श्री. महेशभाऊ परजणे, श्री. अनिल शेटे, श्री. चिमाजी दैने, श्री. राजेंद्र नवाळे, श्री. प्रकाश बारहाते व संजीवनी कारखाना पीए विभागातील श्री. गणेश कोताडे यांच्या उपस्थितीत सुपुर्त करण्यात आल्या.

या उपक्रमास शाळचे मुख्याध्यापक मा.श्री. रमेशजी मोरे सर,पर्यवेक्षक श्री. विजय जेजुरकर सर, ज्येष्ठ शिक्षक श्री. पवन कुमार सांगळे सर, श्री. भगवान शिंदे सर, श्री. विलास मोरे सर, श्री. खेताडे सर, श्री. भोये सर, श्री. बोडरे सर, श्रीमती चौधरी मॅडम, श्रीमती नागरे मॅडम, श्रीमती महामुनी मॅडम, श्रीमती म्हस्के मॅडम, श्रीमती राठोड मॅडम, यांनी विद्यार्थीनींना विशेष सहकार्य केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. भगवान शिंदे सर यांनी केले तर शेवटी उपस्थितांचे आभार श्री पवन कुमार सांगळे सर यांनी केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!