
कोपरगाव : – भारताला स्वतंत्र मिळुन ७९ वर्षे झाली. ७९ व्या भारतीय स्वतंत्र दिनानिमित्त सामाजिक, धार्मिक, राजकिय क्षेत्रात नेहमी सहभागी असणारे तसेच उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना कोपरगाव उपतालुका प्रमुख व गावचे नागरीक राजुभाई शेख व आरपीआय चे भगवान खळे यांच्या वतीने गुरुवर्य तुकाराम बाबा विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुंभारी येथील शालेय विद्यार्थ्यांना १५ ऑगष्ट २०२५ रोजी (केळी) खाऊचे वाटप करण्यात आले.
यावेळी मुख्याध्यापक मा. श्री. बागुल सर, सर्व शिक्षक -शिक्षिका व कर्मचारी तसेच महिला, ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते .
आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना उ.बा.ठा. शिवसेना कोपरगाव उपतालुका प्रमुख राजूभाई शेख म्हणाले कि, आपण ज्या ज्ञान मंदिरात शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभं राहण्याची क्षमता /ताकद मिळविली, त्याची उत्तराई म्हणून आपण काही तरी देणे लागतो या उदात्त हेतूने आपण दरवर्षी १५ ऑगष्ट व २६ जानेवारी या राष्ट्रीय सणाला शालेय विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे खाऊचे वाटप करून विद्यार्थ्याच्या आनंदात सहभागी होत असतो. निश्चितच ; त्यांच्या या सहभागामुळे विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणीत होताना पहावयास मिळतो त्याचे वर्णन करणे अशक्यच. राजुभाई शेख यांनी हाती घेतलेले कार्य हे इतरांना प्रेरणादायी ठरेलं असे गौरोद्गार मुख्याध्यापक श्री. बागुल सर यांनी काढले.