Homeकोपरगावकुंभारी येथे विविध कार्यालयांच्या वतीने ७९ वा भारतीय स्वातंत्र दिनाचे ध्वजारोहन उत्साहात...

कुंभारी येथे विविध कार्यालयांच्या वतीने ७९ वा भारतीय स्वातंत्र दिनाचे ध्वजारोहन उत्साहात संपन्न

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

कोपरगाव : -७९ वा भारतीय स्वातंत्र दिन ग्रामपंचायत कार्यालय कुंभारी च्या वतीने लोकनियुक्त प्रथम महिला सरपंच मा.सौ. देवयानी प्रशांत घुले यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सदस्या मा.सौ. मनिषाताई घुले मॅडम यांच्या हस्ते १५ ऑगष्ट २०२५ रोजी ध्वजारोहन उत्साहात संपन्न झाले.

गुरुवर्य तुकाराम बाबा विद्यालयात लोकनियुक्त प्रथम महिला सरपंच

मा.सौ. देवयानी प्रशांत घुले यांच्या हस्ते तर स्काऊट गाईड ध्वजाचे

ध्वजारोहन कुंभारी गावचे सुपुत्र रिटायर मेजर मा. श्री. जगदीश गंगाधर निळकंठ यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यानी देशभक्तीपर गीतांच्या ध्वनी वर आधारीत राष्ट्र ध्वजास मानवंदना दिली तर काहींनी लेझीम नृत्य सादर

केले. तसेच सर्व विद्यार्थ्यानीं एकत्र कवायत सादर केले . त्याचबरोबर कु. ईश्वरी रिनाकांत कबाडी ह्या विद्यार्थीनीने स्व- संरक्षणासाठी स्वतःभोवती लाठी- काठी फिरविण्याचे प्रात्यक्षिक दाखवून उपस्थितांचे मन जिंकली.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुंभारी येथे ७९ वा भारतीय स्वतंत्र दिनानिमित्त ग्रामपंचायत उपसरपंच मा.सौ. कविताताई ललित निळकंठ यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.

यावेळी शाळेच्या वतीने लेझीम न्युत्य, कवायत व गाईड परेड ने राष्ट्रध्वजास मानवंदना दिली

सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने कुंभारी येथील सुपुत्र,B.A.M.S, (M.U.H.S) नुकतीच डॉक्टर पदवी घेऊन नाशिक येथे साईसेवा हॉस्पिटल स्थित केलेले डॉ. प्रथमेश विठ्ठलराव पवार याच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.

विविध कार्यकारी सहकारी सोसायटी नं. १च्या राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहन कुंभारीचे जेष्ठ नागरिक तसेच रिटायर मेजर मा .श्री.विनोदजी थोरात यांचे वडील मा. श्री. पुंडलिक माधवराव थोरात यांच्या हस्ते संपन्न करण्यात आले .

सदर प्रसंगी लोक नियुक्त प्रथम महिला सरपंच मा.सौ. देवयानी घुले, उपसरपंच व सर्व सदस्य, गुरुवर्य तुकाराम बाबा विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री.बागुल सर सर्व शिक्षक -शिक्षिका, कर्मचारी, सार्वजनिक वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. रमण यादवराव गायकवाड, सचिव, संचालक,आणि कुंभारी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी नं. १ चे चेअरमन मा. श्री. सुनिल ज्ञानदेव कदम, व्हा. चेअरमन सर्व संचालक, आजी -माजी पदाधिकारी तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. दरेकर सर , सर्व शिक्षक – शिक्षिका, विदार्थी -विद्यार्थीनी, महिला ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. त्याचबरोबर उ. बा. ठा. शिवसेना कोपरगाव उप तालुका प्रमुख राजूभाई शेख व आर पी आय चे भगवान खळे यांनी सर्व विद्यार्थ्यांसाठी आणलेली केळी व खाऊचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. जगदाळे सर यांनी केले तर उपस्थित ग्रामस्थांचे आभार श्री. झाडे सर यांनी मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!