
कोपरगाव :- तालुक्यातील साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कमी भाव देऊन शेतकऱ्यांवर अन्यायच केल्याचे अखिल भारतीय काँग्रेस पक्ष,महाराष्ट्र प्रदेश व कोपरगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने नुकतीच राज्यभर गाजलेली साखर कारखाना निवडणूकांमुळे उस उत्पादक शेतकऱ्यांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माळेगांव बारामती साखर कारखान्याप्रमाणे उसाला प्रति टन ₹३७००/ पेक्षा जास्त किंवा बरोबर चा भाव न दिल्याची माहिती प्राप्त झाल्याने काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र निषेध करत असल्याचे काँग्रेस पक्षाचे कोपरगांव तालुकाध्याक्ष नितीन शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

आपल्या प्रसिद्धीपत्रकात श्री. शिंदे पुढे म्हणाले कि, कोपरगाव तालुक्यातील साखर कारखान्यांनी केवळ ₹ २५००/- प्रति टन पेक्षा कमी भाव जाहीर करून शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे. हा निर्णय शेतकऱ्यांवर अन्याय करणारा असून, महायुती सरकार व त्यांच्या स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेचा पुरावा आहे. शेतकऱ्यांची पुर्ण कर्जमुक्ती व शेतमालाच्या भावापासून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न महायुती सरकारचे घटक पक्ष एकमेकावर कार्यकर्त्यांमार्फत राजकीय आरोप करत आहे.
कोपरगांव तालुक्यातील पायाभूत, मुलभूत गरजा भागविण्यासाठी ₹. ३००० कोटींचा निधी आणल्याचा दावा गेल्या विधानसभा निवडणुकीत करत मोठमोठी आश्वासने दिली होती. मात्र, आज कोठेही त्याचा मागमूस दिसून येत नाही. जेव्हा शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला मिळण्याची वेळ आली आहे, तेव्हा हेच साखर कारखाने वाजवी भाव देत नाहीत. हे निवडून सत्तेवर आलेले प्रतिनिधी व त्यांचे त्या वेळचे जोडीदार आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी अगोदर जाणुन बुजून ‘नौटंकी’ करत जनतेला वेठीस धरत आहेत. कर्जमाफी, शेतमालाला योग्य भाव यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांपासून जनतेचे लक्ष विचलित करण्याचा हा जाणीवपूर्वक प्रयत्न करत असल्याचा आरोपही श्री. शिंदे यांनी केला आहे.
प्रसिद्धीपत्रकाद्वारे श्री. शिंदे पुढे म्हणाले कि,भाजप-शिंदे-अजित पवार गटाचे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात आहे, हे या साखर कारखान्यांचे उस दर खरेदी भाव निर्णय हे स्पष्टपणे दाखवून देतात की भाजप, शिंदे आणि अजित पवार यांचा गट असलेले हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करत नाही. केवळ सत्तेसाठी एकत्र आलेले हे पक्ष शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. काँग्रेस पक्ष या अन्यायाचा तीव्र निषेध करत आहे आणि जोपर्यंत शेतकऱ्यांना माळेगाव बारामती कारखान्याप्रमाणे प्रति टन ₹३७००/- पेक्षा जास्त भाव मिळत नाही / देत नाही. तोपर्यंत, शेतकऱ्यांप्रती फक्त पुतना प्रेम आहे. जे फक्त जनतेला नगरपालिका, पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुक प्रचारा दरम्यान दरवेळी प्रमाणे वेड्यात काढायचे आणि आपली सत्तेची पोळी भाजून घ्यायची एवढेच.
तालुक्यातील अतंर्गत रस्ते,पाट पाणी, जनसुरक्षा व वीजपुरवठा याबाबींसह शेतकरी कर्ज मुक्ती बाबत कोणीही प्रस्थापित बोलत नाही ही खूप मोठी शोकांतिका असल्याची श्री.शिंदे यांनी खंत व्यक्त केली.
परंतु,मतदार जनतेला ह्या विधानसभा निवडणुकीतील आश्वासनाचा अजिबात विसर पडलेला नाही. कोपरगांव तालुक्यातील आजी – माजी आमदार यांनी ह्या बाबतीत तालुका बाजार समिती निवडणुकीच्या दरम्यान जसे एकत्र आले तसेच एकत्र येऊन त्यांच्या पक्षातील वरिष्ठ नेते यांच्या कडे केलेल्या शेती मालाला भाव, शेतीवरील कर्जमुक्ती व इतर बाबतीत जनतेला माहीती द्यावी असेही काँग्रेस पक्षाचे कोपरगांव तालुकाध्यक्ष श्री नितीन शिंदे यांनी आपल्या प्रसिद्धीपत्रकात शेवटी म्हटले आहे.