Homeकोपरगावशहरालगत…. या भागात गटारीचे पाणी रस्त्यावर साचल्याने परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य

शहरालगत…. या भागात गटारीचे पाणी रस्त्यावर साचल्याने परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य

कोपरगाव : – कोपरगाव शहरालगत अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या तसेच नागरिकांना दळण वळणाच्या दृष्टीने शहरात ये- जा करण्यासाठी जेऊर पाटोदा भागातील रस्त्यावर चंद्रलिला भागातील रस्त्यावर अक्षरशः गटारीचे पाणी जमा होत असल्याने स्थानिक रहिवाशांना दुर्गंधी सह साथीच्या आजाराला सामोरे जावे लागत आहे. या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांना पायी चालणे कठीण होऊन बसले आहे तर दुचाकी चालविणारांचे अतोनात हाल होत आहे.

असे जिवघेणे प्रसंगाला अजून किती दिवस सामोरे जावे लागेल ? या रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेमुळे आपघाताचे प्रमाण वाढले आहे. स्थानिकांनी अनेक वेळा ग्रामपंचायत विभागाशी पत्रव्यवहार करून सुद्धा जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष केले जात आहे व संबंधित आमच्या भावनांशी खेळत असल्याचे तेथील रहिवाशी बोलत आहे.

या भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून दुर्गंधीचे साम्राज्य पसरले असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. लहान मुलांना आजार होऊ लागले आहेत


वारंवार गटारीच्या समस्या उद्भवत असल्याने रहिवासी ग्रामपंचायतला सांगून वैतागले आहेत. सदरच्या समस्या कायमस्वरूपी निर्मुलनासाठी नागरिक मोठ्या आंदोलनाच्या तयारीत असल्याचे समजले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!