Homeकोपरगावकुंभारी नगरीच्या शिरपेचात एक मानाचा तुरा

कुंभारी नगरीच्या शिरपेचात एक मानाचा तुरा

संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव तालुक्यातील कुंभारी ( शिवाजीनगर ) येथील रहिवासी शेतकरी विठ्ठलराव ठाणगे व रविंद्र ठाणगे यांच्या छोट्याशा कुटुंबातील कन्या कु.सोनाली विठ्ठलराव पा.ठाणगे यांची औरंगाबाद कारागृह पोलिस पदी नियुक्ती झाल्याने त्यांचा माजी. सरपंच विजयराव कदम यांच्या समवेत अनेक ग्रामस्थांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
त्यावेळी बोलतांना कदम म्हणाले कि,विठ्ठल ठाणगे यांची परिस्थिती जेमतेम असतांना सुद्धा मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी मोठया कष्टानेआर्थिक पाठबळ उभे करून त्यांना योग्य दिशा दिली व कुंभारी नगरीच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवल्याचा सार्थ अभिमान व्यक्त करत त्यांचे कौतुक केले व पुनश्च सोनालीस भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी.सरपंच विजय दगडु कदम,सुनिल ज्ञा.कदम, सतिष भास्कर कदम,सुभाष बढे,लक्ष्मण बढे,मच्छिंद्र कदम, गजानन कदम,सोपान ठाणगे, पुंडलिक थोरात, हिराामण कदम, किरण ज.बढे, अरुण पुं.कदम,सूर्यभान कदम,रविंद्र ठाणगे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!