Homeकोपरगावकोपरगाव येथे राष्ट्रीय ई-परिषद : उच्च शिक्षणातील संशोधन, नवोन्मेष, स्टार्टअप्स व बौद्धिक...

कोपरगाव येथे राष्ट्रीय ई-परिषद : उच्च शिक्षणातील संशोधन, नवोन्मेष, स्टार्टअप्स व बौद्धिक संपदेला चालना

कोपरगाव : – रयत शिक्षण संस्था संचलित श्री सदगुरु गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स महाविद्यालय, कोपरगाव येथील वाणिज्य, भूगोल, राज्यशास्त्र, बीबीए विभाग तसेच अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या वतीने “Role of Higher Education in Research, Innovation, Startups & IPR (RHERISI–2026)” या विषयावर एकदिवसीय राष्ट्रीय ई-परिषदचे आयोजन मंगळवार, दि. २४ मार्च २०२६ रोजी करण्यात आले आहे. ही परिषद लक्ष्मीबाई भाऊराव पाटील इनोव्हेशन फाउंडेशन CIII सेंटर, हडपसर, पुणे तसेच चंद्ररूप डाकले जैन कॉमर्स कॉलेज, श्रीरामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत आहे.

या परिषदेत मानवविद्या, सामाजिक शास्त्रे, वाणिज्य, व्यवस्थापन, विज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, उद्योजकता, डिजिटल मार्केटिंग, ई-कॉमर्स, बँकिंग व वित्त, पर्यावरणीय समस्या, राष्ट्रीय शिक्षण धोरण, संशोधन, स्टार्टअप्स, बौद्धिक संपदा हक्क (IPR), नवोन्मेष व पेटंट्स अशा विविध विषयांवर संशोधन सादरीकरणासाठी संशोधक, प्राध्यापक व विद्यार्थ्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. या माध्यमातून उच्च शिक्षण क्षेत्रातील संशोधनाला चालना देत नवकल्पना संशोधन आणि स्टार्टअप्स संस्कृती विकसित करण्याचा उद्देश आयोजकांनी व्यक्त केला आहे.

परिषदेसाठी निवड झालेल्या संशोधन लेखांचे प्रकाशन आंतरराष्ट्रीय स्तरावरील Bulletin of Nexus या जर्नलमध्ये UGC मार्गदर्शक तत्त्वांनुसार डबल-ब्लाइंड पिअर-रिव्ह्यू प्रक्रियेद्वारे करण्यात येणार आहे. यामुळे संशोधकांना CAS प्रमोशन तसेच पदव्युत्तर व पीएच.डी. मान्यतेसाठीही महत्त्वपूर्ण लाभ होणार आहे.

संशोधन लेख सादर करण्याची अंतिम तारीख दि. २३ मार्च २०२६ असून सर्व सहभागींसाठी नोंदणी अनिवार्य आहे. इच्छुकांनी आपले सारांश व पूर्ण संशोधन लेख दिलेल्या ई-मेलवर पाठवावेत तसेच ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

नोंदणी लिंक: https://forms.gle/EPWX8Cm9ATH1k2fA7

WhatsApp Group Link: https://chat.whatsapp.com/EBYQCx3y7KhBb6IzV0yRC8?mode=gi_t

E-Conference Mail ID: ssgmconference@gmail.com

या परिषदेबाबत अधिक माहितीसाठी संबंधित आयोजकांशी संपर्क साधण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!