Homeकोपरगावविश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती उत्साहात साजरी.

विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती उत्साहात साजरी.

कोपरगाव – विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 जयंती सार्वजनिक वाचनालय कुंभारी येथे गावचे जेष्ठ नागरिक अशोकराव खळे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी कुंभारी गावचे जेष्ठ नागरिक अशोकराव खळे, सार्वजनिक वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष रमणआणा गायकवाड, धारणगावचे धम्म प्रवर्तक राजेश राणशुर, नानासाहेब शेजवळ, विकास खळे, भगवान खळे, अविनाश जाधव, दिलिप बर्डे, राजेंद्र चंदनशिव, आदित्य महाजन, भारत पगारे, आयुश खळे, आर्यन खळे, ग्रंथपाल भाऊसाहेब पवार यांसह आदि महिला व ग्रामस्त उपस्थित होते.

वाचनालयाचे व कार्यक्रमाचे अध्यक्ष रमणआण्णा गायकवाड यांनी आपल्या प्रास्तविक पर भाषणात म्हटले कि, आज समता, समानता व बंधुता या त्रिसुत्री विचारांचा अलौकिक ठेवा ज्यांनी सर्वांसाठी घालून दिला त्या महामानवाची 135 वी जयंती आपण साजरी करीत आहोत त्याचबरोबर कुंभारीसह पंचक्रोशितील वाचकांच्या सेवेत या वाचनालयास 35 वर्षे पूर्ण होत आहे हा दुध शर्करा योगच म्हणावा लागेल तसेच संविधान लागू होण्यास 100 वर्षे पूर्ण होत आहे.

पुढे ते म्हणाले की, लोकशाही टिकवायची असेल तर वाचन आवश्यक आहे, वाचनातून डॉ. एपीजे अब्दुल कलाम, रावसाहेब शिंदे, नानासाहेब शिंदे यांसारखी अनेक थोर पुरुषांनी जगाच्या पाठीवर आपला ठसा उमठविला. मोबाईल युगातसुद्धा आजही वाचन हे चालु आहे. एमपीएससी च्या शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना आवश्यक असणारी सर्व पुस्तके आपल्या वाचनालयाकडे उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा.

इथल्या जातीसाठी नव्हे तर मातीसाठी ज्या महापुरुषांनी योगदान दिले त्या सर्व महापुरुषांप्रती कृतज्ञता व्यक्त करत विकास खळे यांनी महामानवास अभिवादन केले.

वाचनालयाच्या वतीने आलेल्या मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व कार्यक्रमाच्या शेवटी वाचनालयाचे सचिव यशवंत गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!