
कोपरगाव :- शेतकरी संपूर्ण जीवसृष्टीसाठी रात्रीचा दिवस करून अन्नधान्य पिकवून स्वतःच्या पोटाचीच खळगी नाही भरवतं, तर तो सर्वांच्या पोटाला लागणाऱ्या अन्नासाठी तो काळ्या आईशी प्रामाणिक राहुन शेती पिकवून जीवसृष्टीला तारतो म्हणूनच शेतकर्याला जगाचा पोशिंदा म्हणतात. हा जगाचा पोशींदा तरला पाहिजे त्यासाठी आपण काय करावे ? कसे करावे ? त्याला काय हव आहे, आपण काय देऊ शकतो याचा सारासार विचार करून शेतकऱ्यास शासनाच्या विविध योजनांचा परिपूर्ण लाभ झाला पाहिजे या उद्देशाने बँक ऑफ इंडियाच्या वतीने दि. 22 जून पासून दि. ३१ डिसेंबरपर्यंत किसान समृद्धी महोत्सवाचे आयोजन करून बँक ऑफ इंडिया कोपरगाव शाखेच्या वतीने दि. १८ जुलै २०२६ रोजी नाशिक झोनल ऑफिसचे चीफ मॅनेजर मा. श्री. अमितजी प्रीतम सर यांच्या प्रमुख उपस्थितीत केक कापूण किसान दिवस मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.


सदर कार्यक्रमाचे प्रास्तविक बँक ऑफ इंडिया कोपरगाव शाखेचे शाखा प्रबंधक मा. श्री. मंगेशजी कडनर सर यांनी केले तसेच प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व पुष्प गुच्छ देऊन सत्कारही केला.

यावेळी नाशिक झोनल ऑफिसचे चीफ मॅनेजर मा. श्री. अमितजी प्रीतम सर, कोपरगाव शाखां प्रबंधक मा. श्री. मंगेशजी कडनर सर, ऋृण प्रबंधक मा.श्री. दत्तात्रय गवळी सर, अधिकारी गौतम हलदार, प्रतीक इंगळे, पंचायत समिती प्रभाग समन्वयक निवृत्ती दारवंटे, सौ. सुरेखा आवारे, अश्विनी शिंदे, अनुराधा कुऱ्हे, रूपाली कदम यांसह विविध विभागाचे अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी, सेवक वर्ग शेतकरी, अनेक महिला बचत गटाच्या महिला – भगिणी व पदाधिकारी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


यावेळी प्रीतम सर उपस्थितांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की, शासनाने बँकांच्या माध्यमातून सर्वांसाठी अनेक प्रकारच्या योजना अंमलात आणून ठेवलेल्या आहे, ज्यांना शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावयाचा असेल त्यांनी वेळोवळी बँक अधिकार्यांशी संपर्क साधून योग्य ती कागदपत्राची पूर्तता करुन कमीत कमी व्याज दरात लाभ घेता येईल. परंतु त्यासाठी आपला सिव्हील स्कोर ही योग्य असणे तितकेच गरजेचे आहे. बँक ऑफ इंडियाने शेतकऱ्यांसह महिला बचत गटांना प्राधान्य देऊन कोट्यावधी रुपये देऊन व्यावसायाच्या आधारे अनेक कुंटुंबांचा आधार बनली आहे आणि यापुढेही राहणार.

बँक ऑफ इंडिया कोपरगाव शाखेस वेळोवेळी वेगवेगळ्या माध्यमातून सहकार्य करणाऱ्या महिला बचत गटाच्या प्रमुख सी आर पी महिलांना बँकेमार्फत पाहुण्यांच्या हस्ते भेट वस्तु देऊन सन्मानित करण्यात आले. त्याच बरोबर प्रातिनिधी स्वरूपात काही शेतऱ्यांना बँक कर्ज मंजुरी पत्र देण्यात आले आणि उपस्थितांसाठी चहा, नाष्ट्याची व्यवस्था करण्यात आली होती.
कार्यक्रमाचे शेवटी उपस्थितांचे आभार बँकेचे ऋृण प्रबंधक मा.श्री. दत्तात्रय गवळी सर यांनी मानले.