
कोपरगाव ः- आत्मा मालिक एनडीए पूर्वतयारी अकॅडमीचा विद्यार्थी प्रबुद्ध संजय इंगळे याची भारतीय सैन्यदलात लेफ्टनंटपदासाठी निवड झाली. या निवडीमुळे या अॅकाडमीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. त्याच्या निवडीचे वृत्त समजताच अॅकाडमीतील अन्य विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला. अशी माहिती या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिंदे यांनी दिली.
विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी यांनी प्रबुध्दच्या यापुढील वाटचालीस शुभेच्या दिल्या. या अॅकाडमीत त्याला जे प्रशिक्षण मिळाले आणि त्याने अध्यात्मिक वातावरणात जे संस्कार ग्रहण केले त्याचे हे फलीत आहे. अशी प्रतिक्रीया त्यांनी व्यक्त केली.
शिंदे म्हणाले, त्याच्या या यशामुळे अॅकाडमीतील सर्व प्रशिक्षकांच्या कष्टीचे चिज झाले आणि अन्य विद्यार्थ्यांना पुढे जाण्याची प्रेरणा मिळणार आहे. राष्ट्रप्रेम, शिस्त, चारित्र्य आणि सेवाभाव जपणारे जबाबदार अधिकारी तयार करणे हे संस्थेचे कठोर परिश्रम, पालकांचा विश्वास आणि संस्थेच्या प्रशिक्षकांच्या समर्पित कार्यातून प्रबुध्दची जडणघडण झाली आहे. भविष्यातही आत्मा मालिक एनडीए पूर्वतयारी अकॅडमीमधील तरुण भारतीय सैन्यात अधिकारी या नात्याने देशसेवेसाठी जातील असा आम्हाला विश्वास वाटतो.