
कोपरगाव :- आषाढी शुद्ध एकादशीच्या पावन निमित्ताने श्री क्षेत्र संवत्सर ते श्री क्षेत्र सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज आश्रम दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या भव्य पायी दिंडी सोहळ्यात वारकरी व भाविकांसाठी केळी आणि लाडूंचे वाटप करून संवत्सर गावातील युवकांनी सेवाभावाचा आदर्श घालून दिला.

शनिवार, दि. २५ जुलै रोजी सकाळी ८ वाजता श्री क्षेत्र कमळादेवी मंदिर, संवत्सर येथून अत्यंत भक्तिमय वातावरणात दिंडीचे प्रस्थान झाले. टाळ- मृदंगाच्या गजरात, विठ्ठल नामाच्या अखंड जयघोषात आणि अभंगांच्या सुरेल निनादात वारकरी मोठ्या उत्साहात मार्गक्रमण करत होते.

या पवित्र सोहळ्याचे औचित्य साधून संवत्सर गावातील युवकांच्या वतीने सर्व वारकरी भाविकांना ऊर्जादायी लाडू आणि ताज्या केळींचे वाटप करण्यात आले. पायी चालणाऱ्या वारकऱ्यांची सेवा करण्याच्या निस्वार्थ भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या महाप्रसाद उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी कोपरगाव संजीवनी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन राजेंद्र परजणे साहेब, भारतीय जनता पार्टी दिव्यांग सेल, कोपरगाव तालुकाध्यक्ष मुकुंद मामा काळे, संवत्सर ग्रामपंचायत सदस्य महेश भाऊ परजणे, भाजप पूर्व मंडळ युवा मोर्चाचे सदस्य सचिन शेटे, तसेच अनिल भाकरे, विजयराव काळे, चिमाजी दैने, दिनेश बोरनारे, मोहन निकम, अनुप शिंदे, योगेश परजणे, गणेश दैने, नरहरी साबळे, मच्छिंद्र परजणे, यादव दैने, गोकुल मोरे, रवी सोनवणे, विशाल कासार, आप्पासाहेब रानोडे, युवा भाकरे, बाळासाहेब निरगुडे, सचिन भाकरे, योगेश भाकरे, जितेंद्र सोनवणे, सुजित सोनवणे, शंकर पुंड, श्लोक काळे, हेमंत काळे, किरण निरगुडे, संतोष कहाटे, आण्णासाहेब निरगुडे, लहानु गुंड, ज्ञानेश्वर निरगुडे, नानासाहेब सोनवणे, नाना ढेपले, गणेश कोताडे, ह.भ.प. कर्पे महाराज, राजेंद्र कापसे, राजेंद्र भोकरे, वैभव भोसले, शिवाजी घेर, अनिल हिंगे, पुंडलिक गिते, संदीप सोनवणे, धिरज कासार आणि ऋषीकेश वरगुडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

या सेवाभावी उपक्रमामुळे वारकरी संप्रदायातील सेवा, समर्पण आणि भक्तीची परंपरा अधिक दृढ होत असून समाजात सामाजिक ऐक्य, परस्पर सहकार्य आणि अध्यात्मिक संस्कारांना बळ मिळत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
या सेवाभावी उपक्रमाचे कोपरगावच्या प्रथम महिला आमदार मा. सौ. स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे तसेच युवा आमदार मा. श्री. विवेकभैय्या बिपीनदादा कोल्हे साहेब यांनी विशेष कौतुक करून युवकांच्या या सामाजिक व धार्मिक सेवाकार्याचे अभिनंदन केले.