Homeकोपरगावसहकाररत्न शंकरराव कोल्हे शेतकरी सहकारी संघाच्या शतकोत्तर वाटचालीत शेतक-यांचे योगदान महत्वाचे -...

सहकाररत्न शंकरराव कोल्हे शेतकरी सहकारी संघाच्या शतकोत्तर वाटचालीत शेतक-यांचे योगदान महत्वाचे – बिपिनदादा कोल्हे.

कोपरगाव : – शेतीच्या पायाभूत सुविधेसाठी शेतक-यांना बी-बीयाणे, खते, अवजारे, नामांकित कंपन्यांची किटकनाशके, औषधे माफक दर्जेदार, आधुनिक, तात्काळ, विश्वासार्ह सुविधेसाठी माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी ९० वर्षापुर्वी सहकाररत्न शंकरराव कोल्हे शेतकरी सहकारी संघाची स्थापना करून सर्व शेतीविषयक सेवा एकाच छताखाली आणून त्या बांधापर्यंत पुरविल्या संघाच्या या शतकोत्तर वाटचालीत शेतक-यांचे योगदान महत्वाचे असल्याचे प्रतिपादन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी केले.

येथील सहकाररत्न शंकरराव कोल्हे शेतकरी सहकारी संघाची नव्वदावी वार्षीक सर्वसाधारण सभा नुकतीच संपन्न झाली त्यात ते अध्यक्षपदावरून बोलत होते. प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष अंबादास देवकर यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्तविक केले. व्यवस्थापक रावसाहेब रक्ताटे, संदिप ढवळे यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचले. विषयपत्रिकेवरील सर्व नउ विषयांना सभासदांनी टाळयांच्या गजरात मंजुरी दिली. शेतक-यांनी खरेदी केलेल्या मालाचे पैसे शेतकरी संघाच्या सर्व शाखांना ऑनलाईन देता यावे यासाठी ऑनलाईन क्यु आर कोड सुविधा उपलब्ध करून देण्यांत आली त्याचा शुभारंभ श्री. बिपीनदादा कोल्हे यांच्या हस्ते करण्यांत आला.

श्री. बिपीनदादा कोल्हे पुढे म्हणाले की, शेतक-यांच्या दारात आधुनिक तंत्रज्ञान जावे, मुक्त अर्थव्यवस्थेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण होणा-या शेती स्पर्धेत ग्रामिण भागातील शेतकरी मागे राहु नये यासाठी माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी जाणिवपुर्वक प्रयत्न केले, काळानुरूप त्या त्या वेळेला आवश्यक निर्णयांची अंमलबजावणी करत शेतकऱ्यांचा विकास साधला तोच वसा आम्ही समर्थपणे पुढे चालवत आहोत. शेतक-यांनी फसवणुक टाळण्यासाठी शेतीसाठी आवश्यक सोयी-सुविधांची खरेदी सहकाररत्न शंकरराव कोल्हे शेतकरी सहकारी संघातुनच करावी. शेतीला जोडधंदा असावा या उददेशाने दुग्धव्यवसायाबरोबरच मत्स्यपालन, केशर, बांबू-साग लागवड शेतीसाठीचे सर्व मार्गदर्शन संघामार्फत थेट शेतकऱ्यांच्या बांधावर उपलब्ध करून देण्यांत आले आहे. नाविन्यपुर्ण प्रकल्प राबवुन ते यशस्वी करण्यांत संघासह शेतक-यांची भूमिका निर्णायक ठरत आहे. युनायटेड किंगडम विद्यापीठात एआय संशोधन पेपर सादरीकरणांसाठी निवड झालेल्या टाकळी (ता. कोपरगाव) येथील कुमारी धनश्री सुनिल देवकर हिचा यावेळी गौरव करण्यांत आला.

याप्रसंगी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सर्वश्री. बाळासाहेब वक्ते, अरूणराव येवले, आप्पासाहेब दवंगे, रमेश घोडेराव, त्रंबकराव सरोदे, नगराध्यक्ष पराग संधान, साई संजीवनी बँकेचे अध्यक्ष शरद थोरात, बाजार समितीचे सभापती साहेबराव रोहम, संजीवनी मत्स्य संस्थेचे अध्यक्ष विजयराव रोहम, विजयराव आढाव, रमेश उगले, संघाचे संचालक संभाजीराव गावंड, विलास कुलकर्णी, रामभाउ शिंदे, प्रकाश सांगळे, नानासाहेब थोरात, विठठलराव कोल्हे, रावसाहेब थोरात, प्रभाकर बढे, रघुनाथ फटांगरे, भागीनाथ लोंढे, राजेंद्र भाकरे, हिरामण गायकवाड, संजीवनी ग्रुप हेड संजीव पवार, यांच्यासह विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, सभासद, शेतकरी उपस्थित होते. शेवटी उपाध्यक्ष बाजीराव मांजरे यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!