Homeकोपरगावसुरेगांव सोसायटी सभासद शेतक-यांच्या उत्कर्षाचे केंद्र - विलासराव वाबळे

सुरेगांव सोसायटी सभासद शेतक-यांच्या उत्कर्षाचे केंद्र – विलासराव वाबळे

कोपरगांव :- तालुक्याच्या पश्चिम भागात सुरेगांव सहकारी सोसायटी सभासद शेतक-यांच्या उत्कर्षाचे केंद्र असुन यातुन जिल्हा सहकारी बँकेच्या तसेच विविध शासकीय निमशासकीय योजनांची तंतोतंत अंमलबजावणी केली जाते असे प्रतिपादन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री. विलासराव वाबळे यांनी केले.

सुरेगांव सहकारी सोसायटीची वार्षीक सर्वसाधारण सभा नुकतीच संपन्न झाली त्याप्रसंगी ते अध्यक्षपदावरून बोलत होते. प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष गणेश विठठल वाबळे यांनी उपस्थितांचे स्वागत करून अहवाल सालात दिवंगत झालेल्या सभासदांना श्रध्दांजली वाहिली. मागील सभेचे इतिवृत्त व विषय पत्रिकेवरील सर्व विषय टाळयांच्या गजरात मंजुर करण्यांत आले. उपाध्यक्ष गोरख केशव कदम यांनी सांपत्तीक स्थितीचा आढावा सादर केला. ज्येष्ठ मार्गदर्शक मोहनतात्या वाबळे याप्रसंगी बोलतांना म्हणाले की, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी ग्रामिण अर्थकारणाची चळवळ मजबुत करून सहकारी संस्थांच्या प्रगतीसाठी असंख्य योजना सुरू केल्या. संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी प्रत्येक अडी- अडचणींत साथ दिली.

श्री. विलासराव वाबळे पुढे म्हणाले की, यंदा एल निनोच्या प्रभावामुळे खरीप हंगामात वरूणराजा बरसला नाही त्यामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले. महायुती शासनामार्फत दुष्काळी तालुक्यात कोपरगांवचा समावेश व्हावा म्हणून आमदार विवेक भैय्या कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, सुनेत्राताई पवार यांच्याकडे विशेष पाठपुरावा केला. जिल्हा सहकारी बँक पातळीवर ज्या योजना आहेत त्याचा सुरेगांव सोसायटी सभासद शेतक-यांना लाभ मिळवुन देण्यांत आमदार कोल्हे यांनी सातत्याने सहकार्य केले. सोसायटीचे संचालक सर्वश्री. सर्जेराव वाबळे, कुसुमताई सर्जेराव वाबळे, पंकज निंबाळकर, प्रशांत वाबळे, सोपान कदम, कुमार मेहेरखांब, रंजना जनार्दन कदम, राजेंद्र हळनोर, राजेंद्र वाबळे, शंकर कदम यांनी शेतक-यांच्या अडी अडचणी सांगुन संस्था प्रगतीसाठी विधायक सुचना केल्या. संस्थेचे नवनिर्वाचित सचिव नारायण राजगुरू यांचा मोहनराव वाबळे तर आजीव सचिव शांताराम कदम यांचा विलासराव वाबळे यांनी सत्कार केला. बँक व सभासद पातळींवर संस्थेची वसुली ८० टक्के झाली.

याप्रसंगी सर्वश्री. शांताराम मेहेरखांब, रामनाथ वाबळे, उत्तमराव निकम, छबुराव माळी, भाउसाहेब वाबळे, जगन कदम, हेमंत वाबळे, प्रशांत वाबळे, भागवत कदम, यशवंत निकम, शेतकरी सहकारी संघाचे संचालक दिपक हुडे, ग्रामपंचायत सदस्य शरद मेहेरखांब यांच्यासह विविध संस्थांचे आजी माजी सहकारी पदाधिकारी, सभासद शेतकरी उपस्थित होते. शेवटी सचिव शांताराम कदम यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!