Homeकोपरगावसमता पतसंस्थेला एन सी डी सी कडून १०० कोटींचा निधी

समता पतसंस्थेला एन सी डी सी कडून १०० कोटींचा निधी

गुणवत्तापूर्ण कामकाजाची केंद्र शासनाकडून दखल; सोनेतारण कर्जासाठी निधीचा उपयोग

कोपरगाव : भारतातील सहकारी संस्थांच्या व्यवसायवाढीसाठी मार्गदर्शन करण्याबरोबरच त्यांना निधी उपलब्ध करून देणाऱ्या भारतीय राष्ट्रीय सहकार विकास निगम (एनसीडीसी) यांच्या माध्यमातून समता नागरी सहकारी पतसंस्थेला १०० कोटी रुपयांच्या निधी मंजुरीचे पत्र राष्ट्रीय सहकार विकास निगम, पुणेचे रिजनल डायरेक्टर गिरीराज अग्निहोत्री यांच्या शुभहस्ते समता पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले.

समता पतसंस्थेला एन सी डी सी कडून १०० कोटींचा निधी:➡️ गुणवत्तापूर्ण कामकाजाची केंद्र शासनाकडून दखल; सोनेतारण कर्जासाठी निधीचा उपयोग

यावेळी अधिक माहिती देताना संस्थेचे संचालक संदीप कोयटे म्हणाले की, गुणवत्तेच्या निकषांवर सहकारी संस्थांची तपासणी करून केंद्र शासनाच्या राष्ट्रीय सहकार विकास निगमकडून हा निधी उपलब्ध करून दिला जातो. समता पतसंस्थेला मंजूर झालेल्या या निधीचा विशेषतः सोनेतारण कर्ज वाटपासाठी उपयोग केला जाणार आहे.

समता पतसंस्थेने गेल्या ४० वर्षांत केलेली गुणवत्तापूर्ण व्यवसायवाढ तसेच महाराष्ट्रातील इतर सहकारी पतसंस्थांना दिलेले मार्गदर्शन यामुळे समताला मिळालेला हा निधी इतर सहकारी संस्थांसाठीही मार्गदर्शक ठरेल, असे गिरीराज अग्निहोत्री यांनी सांगितले. समताचा आदर्श घेऊन इतर पतसंस्थांनीही गुणवत्तापूर्ण व्यवसायवाढीसाठी प्रयत्न करावेत आणि देशभरात सहकार क्षेत्राच्या प्रगतीसाठी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

संस्थेचे व्हा. चेअरमन अरविंदभाई पटेल म्हणाले की, समताची कठोर थकबाकी वसुली, विशेषतः गेल्या तीन वर्षांत सोनेतारण कर्जवाटपात झालेली लक्षणीय वाढ आणि ग्राहकांचा संस्थेवरील विश्वास या बाबींमुळे हा निधी संस्थेला प्राप्त झाला आहे. या निधीचा उपयोग संस्थेच्या प्रगतीसाठी करून समताला आणखी उंचीवर नेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

समता पतसंस्थेच्या गुणवत्तापूर्ण कामकाजाबरोबरच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि संस्थेच्या सामाजिक कार्याचेही गिरीराज अग्निहोत्री यांनी कौतुक केले. समताने राबविलेली समता लिक्विडिटी बेस्ड प्रोटेक्शन स्कीम, वसुली पॅटर्न, कॉल सेंटर, फॉरेन्सिक ऑडिट कंट्रोल रूम, समता सहकार उद्योग मंदिर आणि व्हाऊचरलेस बँकिंग प्रणाली याबाबत त्यांनी माहिती घेतली. अशा प्रकारचे उपक्रम इतर सहकारी संस्थांनीही राबवावेत यासाठी राष्ट्रीय सहकार विकास निगम प्रयत्न करेल, असे त्यांनी सांगितले.

समता नागरी सहकारी पतसंस्था सहकार क्षेत्रात करीत असलेले काम महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून देशातील सहकार क्षेत्रासाठी दिशादर्शक ठरत असल्याचेही अग्निहोत्री यांनी नमूद केले. सर्वसामान्य जनतेला सहकारी संस्थांच्या माध्यमातून आर्थिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या समताच्या कार्याचे त्यांनी कौतुक केले.

संस्थेचे सरव्यवस्थापक सचिन भट्टड म्हणाले की, या निधीचा उपयोग सहकाराचे नाव उज्ज्वल करण्याबरोबरच इतर सहकारी संस्थांच्या वाढीसाठीही केला जाईल. गेल्या ४० वर्षांत समताने ग्राहकांचा विश्वास संपादन केला असून, केंद्र शासनाच्या भारतीय राष्ट्रीय सहकार विकास निगमकडून मिळालेला निधी हा त्या विश्वासाला मिळालेली महत्त्वाची पावती आहे.

यावेळी समता पतसंस्थेचे व्हा. चेअरमन अरविंद पटेल, ज्येष्ठ संचालक जितुभाई शहा, कचरू मोकळ, संचालक संदीप कोयटे, दीपक अग्रवाल, गिरीश सोनेकर, संचालिका श्वेता अजमेरा, अक्षरा पटेल, स्वाती कोयटे, समता महिला बचत गटाच्या अध्यक्षा सुहासिनी कोयटे, जनरल मॅनेजर सचिन भट्टड तसेच मुख्य कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!