
कोपरगाव :- शालेय रोल बाॅल स्पर्धेत आत्मा मालिक शैक्षणीक व क्रिडा संकुलाच्या दोन्ही संघांनी विजेतेपद पटाकावले. या संघांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली. विजेत्या खेळाडूंचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

श्रीरामपूर येथील सेंट झेवियर्स स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज यांच्या आयोजनातून ही शालेय रोल बॉल स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत आत्मा मालिक शैक्षणिक संकुलातील विविध विभागांच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला त्यात आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कूलच्या U-14 व U-19 मुलांच्या संघांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत विजेतेपद मिळवीले.

आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कूल विभागाच्या वतीने U-14 मुलींचा एक संघ, तसेच U-14, U-17 व U-19 मुलांचे प्रत्येकी एक संघ सहभागी झाले होते. इंग्लिश मीडियम विभागातून U-17 चा एक संघ, तर मराठी माध्यम विभागातून U-14 चे दोन संघ आणि U-17 चा एक संघ स्पर्धेत सहभागी झाला होता.
U-14 मुलींच्या संघाने द्वितीय व इंग्लिश मिडीयम स्कूल – U17 मुलांच्या संघाने द्वितीय क्रमांक मिळवीला. क्रीडा प्रशिक्षक दत्तात्रय भोसले यांचे या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.
विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, विश्वस्त मंडळातील सदस्य, शालेय व्यवस्थापक सुधाकर मलिक, वसतिगृह व्यवस्थापक साईनाथ वर्पे, मीरा पटेल, प्राचार्य निरंजन डांगे, माणिक जाधव, नामदेव डांगे, नितीन सोनवणे, अशोक शिंदे यांनी या खेळाडूंचे अभिनंदन केले.