Homeकोपरगावएस.एस.जी.एम.चा क्रिकेट संघ जिल्हास्तरीय स्पर्धेचा उपविजेता

एस.एस.जी.एम.चा क्रिकेट संघ जिल्हास्तरीय स्पर्धेचा उपविजेता

कोपरगाव :- अहिल्यानगर जिल्हा क्रीडा कार्यालय आयोजित १९ वर्षाखालील जिल्हास्तरीय शालेय लेदरबॉल क्रिकेट स्पर्धा १४ ऑक्टोंबर रोजी आत्मा मालिकच्या मैदानावर संपन्न झाल्या, सदर स्पर्धेसाठी जिल्ह्यातील १४ तालुके सहभागी झाले होते.

या स्पर्धेत एस.एस.जी.एम कॉलेजच्या संघाने पहिल्या सामन्यात जिवाजीराव महाविद्यालय, दुसऱ्या सामन्यात राहुरी तर उपांत्यपूर्व सामन्यात श्रीरामपूर संघाला पराभूत करत अंतिम फेरी गाठली. अतिम सामना एस. एस. जी. एम कोपरगाव व त्रिमूर्ती कॉलेज नेवासा असा झाला. अंतिम सामन्यात एस. एस. जी. एम संघ नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत ५ षटकात ३१ धावांचे लक्ष ठेवले. लक्षाचा पाठलाग करताना नेवासा संघाने नाबाद ३३ धावा करत जिल्हास्तरीय स्पर्धेचे विजेतेपद पटकविले. तर एस.एस.जी.एम कोपरगाव संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

उपविजेत्या संघातील प्रतिक फुलारे, राम खोमणे या खेळाडूंच्या चमकदार कामगिरीने या दोन खेळाडूंची विभाग स्तरावरील निवड चाचणीसाठी निवड करण्यात आली. सदर स्पर्धेप्रसंगी अहिल्यानगर जिल्हा क्रीडा कार्यालयाचे क्रीडा मार्गदर्शक श्री. विशाल गर्जे व जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे श्री. अजय कविटकर उपस्थित होते.

स्पर्धेतील उपविजेत्या संघातील खेळाडूंचे महाविद्यालयीन विकास समितीचे चेअरमन तथा रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कॉन्सिल सदस्य अॅड. संदीप वर्पे, प्राचार्य डॉ. माधव सरोदे, प्र. उपप्राचार्य श्री. रविंद्र हिंगे व पर्यवेक्षक श्री. माधव रेवगडे यांनी कौतुक व अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. संघाला मार्गदर्शन श्री. संदीप शिंदे, श्री. सुनील कदम यांनी सहकार्य केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!