
संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव,
महाराष्ट्र नवनिर्माण दिव्यांग सेना कोपरगाव यांच्या वतीने आयोजित श्री अमित साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांगांचे रेल्वे पास काढण्यासाठीचे भव्य शिबीर उत्साहात संपन्न झाले.
मनसे दिव्यांग सेना अहमदनगर जिल्हा अध्यक्ष योगेश गंगवाल यांच्या संकल्पनेतून व आयोजनातून मनसे नेते सन्माननीय श्री अमित साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगाव तालुक्यातील दिव्यांग बंधू-भगिनींना रेल्वे पास काढण्यासाठी मंगळवार दि.२४ मे२२ रोजी भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रम मनसे अहमदनगर उत्तर जिल्हा उपाध्यक्ष श्री संतोष भाऊ गंगवाल यांच्या शुभहस्ते तसेच श्री अनिल भाऊ गायकवाड तालुका अध्यक्ष मनसे कोपरगाव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि श्री सुनील भाऊ फंड तालुका मार्गदर्शक कोपरगाव व श्री सतीश कानडे सरपंच वारी यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
सदर शिबिरात जवळपास ९० ते १०० दिव्यांग बंधू-भगिनींनी रेल्वे पास काढण्याचा लाभ घेतला आहे हे शिबिर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मनसे दिव्यांग सेनेच्या कोपरगाव पदाधिकारी भाऊसाहेब पारखे तालुका अध्यक्ष मनसे दिव्यांग सेना, मुकुंद पदे,अरुण जगताप,गणेश वाघ,रेणुका मुंनसी यांनी मोलाची कामगिरी बजावली या उपक्रमात अनेक दिव्यांग बंधू-भगिनीनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन लाभ घेतला.