Homeकोपरगावशैक्षणिक गुणवत्तेवर अधिक लक्ष केंद्रित करणार - शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड

शैक्षणिक गुणवत्तेवर अधिक लक्ष केंद्रित करणार – शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड

कोपरगाव ः- शैक्षणीक गुणवत्तेवर लक्ष केंद्रीत करून शिक्षणाचा दर्जा आणखी वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील रहावे. गुणवत्तावाढीसाठी शिक्षण विभागाच्या विविध योजना कार्यरत आहेत. विविध शिष्यवृत्ती परीक्षा, स्पर्धा परीक्षा, अप्रगत विद्यार्थ्यांच्या साठी विविध उपाय योजना, यु- डायस, सरल पोर्टल, विविध समित्या आदि विषय महत्वाचे आहेत. असे प्रतिपादन माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील कारकिर्दीला 25 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल राबविण्यात येणाऱ्या सेवा संकल्प अभियानांतर्गत आत्मा मालिक शैक्षणीक संकुलात आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.

शिक्षणाधिकारी योजना बाळासाहेब बुगे, उपशिक्षणाधिकारी संजय सरोदे, गटशिक्षणाधिकारी शबाना शेख, अभय कुमार वाव्हळ, धुमाळ, विस्तार अधिकारी सुरेश ढवळे, राहता, कोपरगाव, संगमनेर, श्रीरामपूर व अकोले या तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.

कार्यशाळेचे उद्घाटन शिक्षणाधिकारी (योजना ) बाळासाहेब बुगे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व मान्यवरांचे स्वागत आत्मा मालिकेचे प्राचार्य निरंजन डांगे यांनी केले, तर शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड, बाळासाहेब बुगे उपशिक्षणाधिकारी संजय सरोदे, विस्ताराधिकारी सुरेश ढवळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

याप्रसंगी शिक्षणाधिकारी माध्यमिक संध्या गायकवाड यांना राष्ट्रीय स्तरावरील कुशल प्रशासक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. आत्मा मालिक संकुलाच्या वतीने मिष्ठांन्न भोजन प्रसादाची व्यवस्था करण्यात आली ‌‌.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!