Homeकोपरगावजेष्ठ नागरिक सेवा मंचच्या अध्यक्षस्थानी सौ सुधा भाभी ठोळे यांची निवड

जेष्ठ नागरिक सेवा मंचच्या अध्यक्षस्थानी सौ सुधा भाभी ठोळे यांची निवड

संपादक -राजेंद्र तासकर

कोपरगाव सातत्याने सेवाभावी कार्यात अग्रेसर असणाऱ्या सन १९९९ साली कै. भागचंदभाऊ ठोळे यांच्या संकल्पनेतून व अॅड.कै.पि.डी. दादा गुजराथी,प्रा.अमरनाथ लोंगानी,कै.सी.आर भायभंग,कै. छोटुभाई जोबनपुत्रा चाचा,विजय बंब,चंद्रकांतशेठ ठोळे आदिंच्या सहकाऱ्याने स्थापन केलेल्या जेष्ठ नागरिक सेवा मंचच्या अध्यक्षस्थानी सौ.सुधा भाभी ठोळे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.

मंचच्या उपाध्यक्षपदी दत्तोपंत कंगले,कार्याध्यक्ष पदी विजय बंब,कोशाध्यक्षपदी अमरनाथ लोंगानी (सी ए),सचीव योगाचार्य उत्तमभाई शहा,सदस्य म्हणून डॉ. दत्तात्रय मुळे,डॉ विलास आचारी, एस.एल.कुलकर्णी (सी ए), अनिल पांढरे,ह.भ.प.जगन्नाथ थोरे,वसंत तात्या आव्हाड, कैलास ठोळे,सुवालाल भंडारी, महंमद दारुवाला यांची तर महिला समितीच्या अध्यक्षपदी रजनीताई गुजराथी यांची निवड करण्यात आली आहे.

या समिती निवड प्रसंगी सौ.शैलजा रोहोम आणि जेष्ठ नागरिक सेवा मंचचे सभासद उपस्थित होते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

नवनिर्वाचित समितीच्या वतीने येत्या वर्षभरात विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य,गणवेश वाटप,जेष्ठ नागरिकांना आरोग्य योजनेची माहिती,आरोग्य विषयक शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

निवड

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!