
संपादक - राजेंद्र तासकर
नुकत्याच झालेल्या इलेमेंटरी चित्रकला परीक्षेत एस.डी.जाधव इंग्लिश मीडियम स्कूल शहा येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित केले आहे,या परीक्षेसाठी बसलेल्या या शाळेतील विद्यार्थ्यांचा निकाल नेहमी प्रमाणे 100% लागला असून शाळेच्या नावलौकीकात भर पडली असल्याची माहीती शाळेचे मुख्याध्यापक नीलकंठ सर यांनी दिली.
या परीक्षेसाठी गाढे संस्कृती धर्मेंद्र,घुमरे सिद्धी विजय,घुमरे शुभम आत्माराम,कांगणे शुभम विलास,थोरात साक्षी सचिन,
आभाळे प्रांजल नितीन या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन आपल्या शाळेची १००% निकालाची परंपरा टिकवली आहे.
या यशाबद्दल शाळेचे संस्थापक अध्यक्ष संभाजी जाधव सर यांनी या परीक्षेस बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करून शाब्बासकीची थाप देऊन अभिनंदन केले व शाळेचे कला शिक्षक निचित सर यांचे सुद्धा अथक परिश्रम घेऊन यश संपादन केल्याबद्दल अभिनंदन केले आहे.
या चित्रकला परीक्षेत घवघवीत यश मिळविल्याबद्दल सर्व विद्यार्थ्याचे पंचक्रोशितून सर्वत्र अभिनंदन होत आहे.