Homeकोपरगावशिक्षक दिनानिमित सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षकांच्याप्रती आदरभाव व्यक्त

शिक्षक दिनानिमित सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षकांच्याप्रती आदरभाव व्यक्त

संपादक – राजेंद्र तासकर

  सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षकांच्याप्रती आदरभाव व्यक्त करण्यासाठी  "शिक्षक दिन "साजरा केला जातो.शिक्षकांच्या शैक्षणिक योगदानाबद्दल व सामाजिक सेवेबद्दल शिक्षकांना सन्मानित केले जाते,असे विचार श्री रेणुका माता मल्टी स्टेट को ऑपरेटिव्ह अर्बन सोसायटीच्या व्यवस्थापिका सौ.अनुराधा रणदिवे यांनी व्यक्त केले.
  बंब प्लाझा येथील श्री रेणुका माता मल्टी स्टेट को ऑपरेटिव्ह अर्बन सोसायटीच्यावतीने शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.कोपरगाव शहरातील सेवानिकेतन स्कुलमधील शिक्षक, श्री चक्रधर स्वामी,एस जी विदयालय,माधवराव आढाव विद्यालय,ऊर्दू शाळा आदि शाखेतील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री रेणुका माता मल्टी स्टेट को ऑपरेटिव्ह अर्बन सोसायटीच्या वतीने आजतागायत अनेक सामाजिक उपक्रम राबविले गेले आहेत.बचत खाते,ठेवीसंबधिची माहिती,महत्व दिले जाते आहे. संस्थापक अध्यक्ष प्रशांत भालेराव यांच्या संकल्पनेतून अनेक सामाजिक उपक्रम हाती घेतले आहेत.समाजातील गुणवंत व्यक्तीला सन्मानित करण्यात आले आहे.
      या प्रसंगी सेवानिकेतनचे स्काऊट गाईड ज्ञानदेव घोरपडे, उपशिक्षक जाधव,साहित्यिक हेमचंद्र भवर,कळसकर सर, आरती कोरडकर,सुनिता इंगळे, यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या.प्रल्हाद वाघ यांनी आभार मानले.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!