
शिक्षक हा समाजाचा मार्गदर्शक असुन त्यामुळेच संस्कारक्षम समाजाची बांधणी होते

संपादक – राजेंद्र तासकर
कोपरगांव शहरांतील श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत ५ सप्टेंबर डाॕ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म दिवस राष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून उत्साहाने संपन्न झाला.
श्री.गो.विदयालयात डाॕ. राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पुजन मुख्याध्यापक श्री.मकरंद को-हाळकर यांच्या हस्ते झाले. आज विदयालयांत विदयार्थी शिक्षक झाले होते व वर्गात विदयार्थीना शिकवित होते.
यावेळी समता पतसंस्थेच्या गांधी चौक शाखेचे शाखाधिकारी श्री.योगेश मोरे व अक्षय कुलकर्णी यांनी विदयालयाचे मुख्याध्यापक श्री.मकरंद को-हाळकर आणि उपस्थित शिक्षकांचा समता पतसंस्थेच्या वतीने सत्कार केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विदयालयांचे उपमुख्याध्यापक आर.बी.गायकवाड यांनी केले.
शिक्षक विदयार्थीं घडवतांना पुर्ण मेहनत घेतात.शिक्षक समाज घडवतात त्यातुनच संस्कारक्षम समाजाची बांधणी होते असे स्पष्ट करुन विदयालयातुन घडलेल्या विदयार्थीमध्ये कुलगुरु पासुन ते आदर्श शिक्षकांची मोठी परंपरा आहे व हे विदयार्थी देशपातळीवर शाळेचे नांव उंचावत आहे असे त्यांनी सांगितले.

समताचे शाखाधिकारी श्री. योगेश मोरे यांनी मी या शाळेचाच विदयार्थी असुन शाळेतील संस्कारामुळेच मी घडलो असे सांगितले.या वेळी सर्व शिक्षकांना गुलाबपुष्प देवुन त्यांचा गौरव करण्यात आला.
विद्यालयांचे चेअरमन चंद्रकांत ठोळे,संस्थेचे अध्यक्ष कैलास ठोळे,सचिव दीलीप अजमेरे,सहसचिव सचिन अजमेरे,संदीप अजमेरे,डाॕ.अमोल अजमेरे आदीनी शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी विदयालयांत शिक्षक दिना निमित्त परीपाठ सादर केला.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन रिध्दि चव्हाण हीने केले.सिध्देश बोराडे,रामेश्वर निंबाळकर,तारामती जगदाळे, सार्थक वाघ,सिध्दी चव्हाण व महेक शेख यांची भाषणे झाली. आरती म्हस्के हिने गीत सादर केले.शेवटी पर्यवेक्षक यु.एस. रायते यांनी शेवटीआभार मानले.
सदर कार्यक्रमास श्री.एन. के.बडजाते,जाधव ई.एल,ए.बी. अमृतकर,ए.के.काले,व्ही.एन. कार्ले आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद,तसेच समता पतसंस्थेचे कर्मचारी वर्ग उपस्थित होता.