
संपादक – राजेंद्र तासकर
कोपरगाव तालुक्यातील कुंभारी येथील ग्रामपंचायतचे सरपंच श्री.दिगंबर गोपीनाथ बढे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत संचालक मंडळातील आदिवासी समाजाचे श्री किशोर भास्कर पवार यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीसाठी सुचक म्हणुन ग्रां.सं.श्री.दिलिप रामचंद्र कातोरे यांनी सुचना मांडली.
कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तसेच जगप्रसिद्ध शिर्डी देवस्थानचे अध्यक्ष माननीय नामदार श्री.आशुतोष दादा काळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गत दोन ते तीन महिन्यापूर्वी कुंभारी ग्रामपंचायत सरपंचपद रद्द झाल्याने नव्याने अधिकृत सरपंचपदाची निवड करण्यात येऊन सरपंचपदी श्री.दिगंबर गोपीनाथ बढे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.त्यांना सर्व समाजाच्या अडी-अडचणी, सामाजिक प्रश्न सहज सोडविता यावे तसेच समाजहिताचे उपक्रम जलद गतीने व पारदर्शक पध्दतीने राबविता यावे म्हणुन उपसरपंचपदाची बिनविरोध निवड ६ सप्टेंबर २०२२ रोजी करण्यात आली.
याप्रसंगी ग्रामपंचायतचे सरपंच दिगंबर बढे,संचालक दिलिप कातोरे,ललित निळकंठ, किशोर पवार,आशिष थोरात,सौ. सिंधुताई घुले,सौ.किरण गायकवाड,सौ.सविता चंदनशिव, सौ.शालन जाधव,सौ.कांचन मोहरे,सौ.जानकाबाई वाघ, आण्णासाहेब बढे,रमण गायकवाड,सुभाष बढे,वसंत लक्ष्मण घुले,गहिनीनाथ घुले, सिताराम जाधव,भागवत चंदनशिव,चांगदेव दळवी,अनिल पवार,दत्तु सुरेश पवार,सौ.मनिषा पवार, ग्रामसेवक कासवे एस.जे, क्लार्क निताताई कदम,ऑपरेटर पैठणे मॅडम,R Oकर्मचारी सागर लुटे,शिपाई रविंद्र व्हरे,पंपमन शंकर चंदनशिव आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
या निवडीबद्दल मा. आमदार तसेच कर्मवीर शंकररावजी काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व शिर्डी देवस्थानचे अध्यक्ष नामदार.आशुतोष दादा काळे साहेब यांनी अभिनंदन केले तसेच पंचक्रोशितील ग्रामस्थांमधून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.